राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ओबीसींचे आरक्षण रद्द - सचिन राजुरकर

चंद्रपूर: ओबीसींच्या राजकीय आरक्षण- राजकिय आरक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने ओबीसी असलेली राजकिय पक्ष, सर्व जातींची मंडळे, पतसंस्था, ईतर संस्था, वैयक्तीकरित्या सूचना मागितल्या असून येत्या १० मे २०२२ पर्यंत आयोगाला भेटून अथवा पोस्टाद्वारे पाठवायचे आहे. त्यामुळे ओबीसींच्या राजकीय आरक्षण साठी ओबीसी बांधवांना निवेदन पाठविणे सोयीचे व्हावे यासाठी ८ मे २०२२ ला सायंकाळी ६ वाजता शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

Recommended read: चंद्रपूरात तिसरे फुले-शाहू-आंबेडकर ओबीसी महिला साहित्य संमेलन ८ मे ला

८ मे ला होणाऱ्या बैठकीला सर्व राजकिय पक्षाचे पदाधिकारी, ओबीसीत मोडणाऱ्या जात संघटना, ओबीसी बांधवांनी बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांनी केली आहे.

आयोगाला निवेदन पाठविण्याचा ईमेल आयडी- dcbccmh@gmail.com असून व्हाॅट्सॲप नंबर-9122240622121 यावर पाठविता येणार आहे.

3 thoughts on “ओबीसींच्या राजकीय आरक्षण संदर्भात ८ मे ला बैठक”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!