कटर ब्लेड विक्री: जिल्हा सामान्य रुग्णालयासमोरील मेडिकल स्टोअर सील

आम आदमी पार्टीचे तक्रारीनंतर कारवाई

चंद्रपूर: डोळ्यांचे शस्त्रक्रियेसाठी लागणारे अवघ्या ६० रुपये किमतीचे कटर ब्लेड तब्बल ६०० रुपयांना विकणाऱ्या औषधालयाचे विरोधात अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई केली. आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी दिलेल्या तक्रारीनंतर मोका चौकशी करून या औषधालयाला सील ठोकण्यात आले आहे.

Recommended read: दिवाळी २०२२ : आतषबाजीला महागाईचे ‘फटाके’

शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये डोळ्याचे शस्त्रक्रियेसाठी जिल्ह्याभरातून मोठ्या प्रमाणात रुग्ण येत असतात. शस्त्रक्रियेसाठी कटर ब्लेड ची गरज भासते. डॉक्टरांच्या सांगण्यावरून ते खासगी मेडिकल मधून विकत घेतले जाते. जिल्हा सामान्य रुग्णालयात पुरेसा औषध साठा असताना श्रीजी मेडिकल मधूनच हे ब्लेड विकत घेण्यासंदर्भात डॉक्टरांचा कमीशनखोरी करीता हट्ट असतो.

Recommended read: युवकांनी पुढे येऊन समाजाचे नेतृत्व करावे- आ. वडेट्टीवार

डॉक्टर आणि औषधालय संचालकांनी साटेलोटे करून ६० रुपये किमतीचे हे ब्लेड तब्बल ६०० रुपयांना विकण्याचा सपाटा लावला होता. आतापर्यंत हजारो रुग्णांनी सदर ब्लेड विकत घेतले. रुग्णांकडून दहा पटीने अवैध पद्धतीने आर्थिक लूट करण्यात येत असल्याची बाब आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांच्या लक्षात आली. त्यांनी या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविली. त्यानुसार गुरूवारी लगेच अन्न व औषध प्रशासनातील अधिकारी श्री. डांगे यांनी सर्वात समक्ष मोका चौकशी केली.

Recommended read: जिल्हा व तालुका पातळीवर दिवाळी फराळ महोत्सव २०२२ आयोजन

आम आदमी पार्टीने या संदर्भात जिल्हा शल्य चिकित्सकांना देखील कळविले होते. आज झालेल्या चार ते पाच तास चाललेल्या चौकशी दरम्यान ६० रूपये किमतीचे ब्लेड सहाशे रुपयांना विकत असल्याचा प्रकार अधिकाऱ्यांच्या डोळ्यादेखत घडला आणि तो उघड झाला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासन विभागाने श्रीजी मेडिकलला सील लावण्याची कारवाई केली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टरांच्या माध्यमातून गरीब रुग्णांची मोठ्या प्रमाणात लूट करण्याचा हा प्रकार आम आदमी पार्टीच्या माध्यमातून उघड झाला आहे. आर्थिक फसवणूक करणाऱ्या औषधालय व डाॅक्टरवर फौजदारी गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टी चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष सुनील मुसळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!