अभिलिप्सा पंडा, बाहुबली बंजरग बली, शिवगर्जना ढोल पथक ठरले विशेष आकर्षण

चंद्रपूर : आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन माता महाकाली भक्तगण आणि माता महाकाली सेवा समितीच्या वतीने आयोजित महाकाली महोत्सावा निमित्त निघालेल्या माता महाकाली पालखी नगर प्रदक्षिणा शोभयात्रेत भक्तीचा महासागर चंद्रपूर नगरीत उसळला. अभिलिप्सा पंडा, बाहुबली बंजरग बली, शिवगर्जना ढोल व ध्वज पथक या शोभायात्रेचे विशेष आकर्षण ठरले.

Recommended Read: धक्कादायक… घुग्घुसमध्ये दिव्यांग मुलीवर अत्याचार

हरहर शंभु गाण्याच्या सुप्रसिध्द गायीका अभिलिप्सा पंडा यांच्या रोड शो नेही शोभयात्रेत भक्तीची रंगत भरली. सदर शोभयात्रेत 13 अश्व, अश्व आरुढ नवदुर्गांचे बोलके दृश्य, अश्व आरुढ राणी हिराईचे बोलके दृश्य, श्री. माता महाकालीची चांदीची मूर्ती व पादुका पालखी, अब्दागीरी व तूतारी, पोतराजे नृत्य, अश्वावर देवी देवतांचे साकारलेले बोलके दृष्य, नागपूर, चंद्रपूर, राजुरा येथील तिन ढोल ताशा पथक, दोन बॅंड पथक, गायत्री परिवाराचा 100 महिलांचा कळस समुह, 100 शंखनाथ महिलांचा समुह, १५० लोकांचे पाच लेझीम पथक, 100 महिलांचे ध्वजधारी पथक, 3 ध्वनी वादक पथक, पवनसुत प्रभु श्री बाहुबली हनुमान यांचे बोलके दृष्य, पुरुष आणि महिला दांडीया समुह, योग्य नृत्य परिवारातील १०1 पुरुष महिलांचे योग नृत्य, 4 आदिवासी नृत्य, 1 लैंगी बंजारा समाज नृत्य, 100 मुला आणि मुलींचे कराटे प्रात्याक्षिक दृष्य, 80 वादकांसह जगदंब ढोल पथक, शिवाज्ञा वाद्य पथक यांच्यासह इतर धार्मीक सांस्कृतीक आणि सामाजिक देखाव्यांचा सहभागी झाले होते. शोभायात्रेत मोठा जनसागर सहभागी झाला होता.

Recommended read: वनमंत्र्याच्या जिल्ह्यातच अतिक्रमित शेतकऱ्यावर वनविभागाची मुजोरी

माता महाकाली देवस्थान :आज सोमवार चे कार्यक्रम

माता महाकाली पुजन, माहुरगडचे प्रसिध्द बाळु महाराज यांचे श्रीमद् माता महाकाली देवी भागवत कथा, सुंदरकाड, स्त्री शक्ती या विषयावर लघु नाटिका, धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक विषयावर समुह गायन व नृत्य, अकोला येथील उमेश आणि नेतल शर्मा यांची भजन संध्या

उद्या मंगळवार चे कार्यक्रम

माता महाकाली आरती, शक्ती संवर्धन, पर्यावरण संरक्षण महायज्ञ, 999 कन्या भोजन व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!