चंद्रपूरात पहिल्यांदाच श्री माता महाकाली महोत्सव

शनिवारपासून माता महाकाली महोत्सव मध्ये राहणार विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमाची रेलचेल

आमदार किशोर जोरगेवार यांची पत्रकार परिषदेत माहित

चंद्रपूर : चंद्रपूरची आराध्य देवी श्री माता महाकाली मंदिर परिसरात पहिल्यांदाच श्री माता महाकाली महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

Recommended read: चंद्रपूर शहरात तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली

१ ते ४ ऑक्टोबर या कालावधीत हा महोत्सव होणार असून श्री महाकाली माता सेवा समितीच्या पुढाकारातून होणाऱ्या या महोत्सवात विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम होणार आहे. माता महाकालीचा भव्य पालखी सोहळा महोत्सवाचे विशेष आकर्षण असणार असल्याची माहिती संयोजक आमदार किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१ ऑक्टोबरला :

सकाळी ९ वाजता श्री माता महाकालीची आरती झाल्यानंतर महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

सकाळी ११ वाजता माहूरगड येथील बाळू महाराज यांचे श्रीमद् माता महाकाली देवी भागवत कथा

दुपारी २ वाजता आत्मनिर्भर दुर्गा यांचा सत्कार

सायंकाळी ४.३० वाजता चैताली खटी यांचा चंद्रपूरची कर्तृत्व शालिनी, महाराणी हिराई हा संगीतमय एकपात्री नाट्यप्रयोग

७ वाजता अजित मिनोचा यांचे देवी जागरण होईल.

Recommended read: कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया नंतर ही पत्नी झाली गर्भवती

४ ऑक्टोबरला :

सकाळी ९ वाजता आरती

९.३० वाजता शक्ती संवर्धन, पर्यावरण संरक्षण महायज्ञ

११ वाजता श्री माता महाकाली महोत्सव आयोजकांचा सन्मान सोहळा

१ वाजता ९९९ कन्यांचे कन्या भोजन व महाप्रसाद असे कार्यक्रम होणार आहेत.

राज्याचे अन्न व औषण प्रशासन मंत्री संजय राठोड यांची उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थिती राहणार आहे. पत्रकार परिषदेला अजय जयस्वाल, बलराम डोडाणी, सुनिल महाकाले, ॲड. मोगरे, मुंधडा यावेळी उपस्थित होते.

Recommended read: गडचिरोली पोलीस – नक्षल चकमक

२ ऑक्टोबरला निघणाऱ्या माता महाकाली नगर प्रदक्षिणेसाठी आठ किलो वजनाची मातेची चांदीची मूर्ती देण्याची घोषणा सराफा आसोसिएशनच्या वतीने करण्यात आली होती.

सदर मूर्ती तयार झाली असून शनिवारी शोभायात्रा काढत मातेची मूर्ती महाकाली मंदिर येथे नेण्यात येणार आहे, असे सराफा असोसिएशनचे शहर अध्यक्ष भारत शिंदे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!