आत्महत्याचा प्रयत्न : पत्नीचा मृत्यू तर तिघांची प्रकृती चिंताजनक

चंद्रपूर : हाताला काम नाही, त्यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे ब्रम्हपुरी शहरातील देलनवाडी येथील सहकार कॉलनी वास्तव्याला असलेले रमाकांत दामोधर ठाकरे (५५) पत्नी गीता (५०)व मुलगा राहुल (२८),मनोज (२६) यांचे कुटुंबाने विष प्राशन करून सामूहिक आत्महत्याचा प्रयत्न केल्याची घटना आज रविवार २५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.

Recommended read: घरी न सांगता पोहायला जाण्याचा बेत जीवावर बेतला

सदर प्रकरणात महिलेचा मृत्यू झाला तर वडील व दोन मुलांची प्रकृती चिंताजनक असल्याने खळबळ उडाली आहे.

सहकार कॉलनीत एका अपार्टमेंट मध्ये रमाकांत दामोधर ठाकरे हे पत्नी गीता व मुलगा राहुल ,मनोज यांचे सह किरायाने राहतात. मागच्या काही दिवसापासून त्यांचे हाती काम नव्हते. कुटुंबाचा प्रपंच सांभाळताना त्यांना आर्थिक अडचणी मुळे खूपच त्रास होत होता. प्राप्त माहिती नुसार त्यांचे कडे मोबाईल रिचार्ज करता सुद्धा पैसे नसल्याने त्यांनी घरी असलेले मोबाईल विकून घराचा खर्च चालवला असल्याची माहिती आहे.

Recommended read: बाधित शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी तलाठीकडे बैंक खाते क्रमांक जमा करण्याचे आवाहन

शुक्रवारी 23 रोजी मध्यरात्री चौघांनी मिळून चर्चा करून आत्महत्येचा निर्णय केला. रात्रीला १२ नंतर त्यांनी दोन तीन प्रकार कीटकनाशक मिस्क करून एक एक ग्लास ते प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केला.

प्राप्त माहिती नुसार दोन दिवसापासून त्यांनी काहीच खाल्ले नसल्याची माहिती आहे. विष घेतल्यानंतर ते काल दिवसभर अत्यावस्थेत पडून होते. आज रविवार २५ रोजी अगदी पहाटे रमाकांत यांना थोडा होष आला तेव्हा त्यांनी बघितलं दोन्ही मुल जिवंत आहेत मात्र पत्नी निपचित पडून दिसली.

Recommended read: वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार

पहाटे ५ च्या दरम्यान रमाकांतने तशाच अवस्थेत सायकलने लहान भावाचे घर गाठून त्याला ही कल्पना दिली. रमाकांतचा भावाने लगेच आपल्या वाहनाने चारही लोकांना ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येथे भरती केले.

उपचारा दरम्यान गीता ठाकरे यांचे निधन झाले. तर पती रमाकांत यांना ब्रम्हपुरी तील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले तर दोन्ही मुलांना गडचिरोलीला उपचारार्थ पाठवण्यात आल्याची माहिती आहे. पुढील तपास ब्रम्हपुरी पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!