प्रदर्शनापूर्वीच पल्याड या मराठी चित्रपटाला अनेक नामांकन

पल्याड सिनेमाचा पोस्टर व टिझरचे अनाावरण

बल्लारपूर तालुक्यातील रुचित निनावेची मुख्य भुमिका


चंद्रपूर: बहुचर्चित मराठी चित्रपट पल्याड चा पोस्टर आणि टिझर अनावरण भव्य दिव्य सोहळा दिनांक ७ एप्रिल२०२२ ला ऐलिवेट फिल्मस मार्फत शकुंतला लॉन येथे पार पडला. या चित्रपटाची कथा सामाजिक विषयावर आधारित असून शिक्षणातुन अंधश्रध्देवर मात करून शिक्षणाची पायवाट धरणाऱ्या स्मश्यान जोगी कुटूंबावर आधारीत आहे. प्रदर्शनापूर्वीच पल्याड या मराठी चित्रपटाने आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील नामांकन व पारीतोषीके पटकावलेली आहेत.

उत्तम निर्मिती, सुमधुर गिते व संगित, दर्जेदार कथामांडणी, व दमदार दिग्दर्शन असलेल्या पल्याड या चित्रपटाची निर्मिती प्रथमच ऐलिवेट फिल्मसचे निर्माते पवन सादमवार व सुरज सादमवार यांनी लावण्यप्रिया आर्ट यांच्या सहकार्याने निर्माते मंगेश दुपारे, प्रणोती पंचाळ, शैलेश भिमराव दुपारे यांनी केली आहे. तर सहनिर्माता म्हणुन रविंद्र वांडरे, सहायक दिग्दर्शक गौरवकुमार पाटील, सहनिर्माता शिवशंकर निमजे, लक्ष्मण निमजे, माया निनावे, रोशनसिंह बघेल आहेत.

Recommended read : चंद्रपूर- शॉर्ट सर्किटमुळे कॅफे मद्रास ला भीषण आग

चित्रपटाची कथा पटकथा व संवाद सुदर्शन खडांगळे व शैलेश भिमराव दुपारे यांनी लिहलेली आहे. भारतीय फिल्म आणी टेलीव्हीजन इन्टीट्युट मधून शिक्षण घेतलेले चंद्रपूर च्या मातीतील दिग्दर्शक शैलेश भिमराव दुपारे यांनी पल्याड हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केलेला असून सदर चित्रपटाचे चित्रीकरण चंद्रपूर जिल्हातील सिंदेवाही तालुक्यातील ग्रामीण भागात झाले आहे.

चित्रपटातील मुख्य भुमिकेत राष्ट्रीय पारितोषीक विजेते अभिनेते शशांक शेंडे आणि देविका दफतरदार तसेच कोर्ट या चित्रपटातील विरा साथीदार व देवेंद्र दोडके आहेत. सह कलाकार म्हणून सायली देठे, गजेश कांबळे, भारत रंगारी, रवि धकाते, बबीता उके, सुमेधा श्रीरामे, ॲड चैताली बोरकुटे, अश्विनी खोब्रागडे, गौरवकुमार पाटील, शुभम उगले, समिर विरुटकर, रविंद्र वांढरे, राजु आवळे आहेत. तसेच चंद्रपूरातील अनेक स्थानिक कलाकारांना या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. मुख्य म्हणजे बल्लारपूर तालुक्यातील रुचित निनावे या बाल कलाकाराने मुख्य भुमिका साकारलेली आहे.

तांत्रीक बाबी म्हणुन छायांकन मोहर माटे, संकलन मनिष शीर्के, संगीत दिग्दर्शक जगदीश गोमीला, सॅम ए.आर, तुषार पारगांवकर, पार्श्वसंगीत मंगेश धाकडे, लोकेश कनिधी, कला दिग्दर्शक अनिकेत परसावार, रंगभुषा स्वप्नील धर्माधिकारी व अश्विनी धर्माधिकारी, वेषभुषा विकास चहारे, गीत प्रशांत मडपुवार, अरुण सांगोळे व गायक अनन्या दुपारे, अवधूत गांधी, शमिता भिडे, सुस्मिरता दावळकर, केतन पटवर्धन यांनी गायलेली आहेत.

Recommended read: धक्कादायक: पत्नीकडून पतीची हत्या

कश्मीर फाईल्स या चित्रपटाचे ध्वनी संयोजक असलेले गिरीश रामटेके यांनी पल्याड चे ध्वनि संयोजन केले आहे. सदर चित्रपट निर्मीतीमध्ये चित्रपटाचे मुख्य सहायक दिग्दर्शक गितेश निमजे, कार्यकारी निर्माता म्हणुन रविंद्र वांढरे, प्रोडक्शन मॅनेजर म्हणुन अमित वाघमारे, रोशनसिंह बघेल भूमिका पार पाडलेली आहेत.

सदर चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच चित्रपट महोत्सवामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील नामांकन व पारीतोषीके पटकावलेली आहेत. त्यात १२ व्या दादासाहेब फाळके फिल्म फेस्टीवल, न्यु दिल्ली, गंगटोक आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल सिक्कीम, न्यु दिल्ली फिल्म फेस्टीवल, न्यु दिल्ली, ब्लॅक स्वॉन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल कोलकाता, बिरसामुंडा आंतरराष्ट्रीय फिल्म अवॉर्ड, तामीळताडु, रिचमॉन्ड आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टीवल, युएसए, सिनेक्वेस्ट फिल्म आणि व्ही आर फिल्म फेस्टीवल युएसए, अशा मानाच्या फिल्म फेस्टीवल मध्ये कलाकृतीची छाप पडलेली आहे. तसेच अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पल्याड चर्चेचा विषय ठरत आहे.

पल्याड चित्रपट येत्या काही महिण्यात रुपेरी पडद्यावर चित्रपटगहात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

One thought on “प्रदर्शनापूर्वीच पल्याड या मराठी चित्रपटाला अनेक नामांकन”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!