चंद्रपूर: कराेनाच्या दोन वषा्रनंतर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रत्यक्ष लेखी परीक्षा घेत आज शुक्रवार १७ जुन ला दुपारी १ वाजता दहावीचा निकाल( SSC result )ऑनलाईन जाहीर केला.

चंद्रपूर जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९५.९७ टक्के लागला असून यातसुध्दा मुलींनी बाजी मारली असून ९७.४३ टक्के मुलीं उर्तीर्ण झाल्या आहेत.

Recommended read: १७ जूनला आयटीआय उत्तीर्णासाठी भरती मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीचा निकाल SSC result शुक्रवार १७ जुन ला दुपारी १ वाजता जाहीर केला. चंद्रपूर जिल्ह्याचा निकाल ९५.९७ टक्के लागला आहे. दहावी परिक्षेसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून १५ हजार १४ विद्यार्थी व १३ हजार ९३८ विद्यार्थिनी असे एकून २८ हजार ९५२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यातील २८ हजार ५६५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यात २७ हजार ४१५ विद्यार्थी उर्तीण झाले आहे. यामध्ये मुलांची उर्तीण टक्केवारी ९४.६० टक्के असून मुलींची टक्केवारी ९७.४३ टक्के आहे. बारावी प्रमाणे दहावीतसुध्दा मुलींनी बाजी मारली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातून बल्लारपूर तालुक्याचा निकाल ९८.४९ टक्के लागला असून हा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक आहे. तर सर्वाधिक कमी निकाल हा जिवती तालुक्याचा असून ९२.७६ टक्के निकाल आहे.

ssc result link-

1- www.mahresult.nic.in

2- sscresult.mkcl

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!