चंद्रपुरात ' M4U ' या कपड्याच्या दुकानाला भीषण आग

M4U स्टोअर – शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता

चंद्रपूर: जटपुरा गेट परिसरात असलेल्या M4U या कपड्याच्या दुकानाला रात्री दहा वाजता सुमारास भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयाचे कपडे जळून खाक झाले असून दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Recommended read: जिल्ह्यात ११ हजार २०५ शेतकऱ्यांच्या खात्यात शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर अनुदानाचे ४७.६२ कोटी रूपये जमा

जटपुरा गेट परिसरात जिल्हा परिषदेच्या मालकीचे वसंत भवन आहे. या वसंत भावनात M4U नावाचे कपड्याचे दुकान आहे. या कपड्याच्या दुकानाला गुरुवारी रात्री दहा वाजता समोर अचानक आग लागली. या आगीमध्ये दुकानातील कपडे जळून खाक झाले आहे. त्यामुळे दुकान मालकाचे मोठे नुकसान झाले आहे.

Recommended read: पुल बांधकामाचे १ कोटीचे बिल काढण्यासाठी मागितली ला

ही आग शॉर्टसर्किटमध्ये लागल्याचे बोलले जात आहे. आगीचे माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!