५ किलोमीटर परिसरातील ६० गावे सतर्कता क्षेत्रात

लम्पी स्कीन डिसीज : राजुरा, कोरपना, जिवती तालुक्याला सर्तकतेचा इशारा

चंद्रपूर: महाराष्ट्रात सद्यस्थितीत गोवंशीय जनावरांवर लम्पी स्कीन डिसीज चा प्रादुर्भाव निदर्शनास आलेला आहे. तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील पशुधनामध्ये लम्पी स्कीन डिसीज लागन झाल्याचे रोग लक्षणावरून निदर्शनास आले आहे.

Recommended read: शासकीय अभियांत्रिकीत टाटा टेक्नॉलॉजीचा २६३ कोटींचा ‘ CIIIT ट्रेनिंग ’ प्रकल्प

लम्पी स्कीन डिसीज मुळे जिल्ह्यातील राजुरा तालुक्यातील आर्वी व रामपुर, कोरपना तालुक्यातील सांगोडा, भारोसा व कोठोडा, जिवती तालुक्यातील जिवती, शेणगांव व येल्लापूर ही ८ गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. ही गावे बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आल्याने रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून पाच किलोमीटर त्रिज्येचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

राजुरा तालुका

राजुरा तालुक्यातील रामपूर परिसरातील पाच किमी सतर्कता क्षेत्रात धोपटाळा, माथरा, सास्ती, राजुरा, बामणवाडा व चुनाळा ही गावे तर मौजा आर्वी सतर्कता क्षेत्रात सुमठाणा, खामोणा, अहेरी, गोयेगाव, अंतरगाव (खुर्द), बोडगाव,कापणगाव ही गावे समाविष्ट आहे.

जिवती तालुका

जिवती तालुक्यातील मौजा जिवती परिसरातील पाच किमी सतर्कता क्षेत्रात गढपांढरवाणी, आसापूर, नागापूर, धोंडाअर्जुनी, मोहाडा, मरकलमेटा, धारपणा, येरमी येसापूर व पकडीगुड्डम, शेणगांव परिसरातील पल्लेझरी, माथाडी, राहापल्ली खुर्द, राहापल्ली बुजुर्ग, करकागोंदी, हिरापुर, टेकाअर्जुनी, धोंडा मांडवा, घाटराहीगुडा, घणपठार, हटकरगुडा तर येल्लापूर परीसरातील लांबोरी, कमलापूर, महाराजगुडा, नारपठार, येल्लापूर(खुर्द) ही गावे समाविष्ट आहे.

कोरपना तालुका

कोरपना तालुक्यातील मौजा सांगोडा परिसरातील पाच किमी सतर्कता क्षेत्रात अंतरगाव, गाडेगाव (वि.), विरुर गाडेगाव, कढोली, कारवाई, वनोजा, सोनूर्ली, हिरापूर ही गावे मौजा भारोसा परिसरातील एकोडी, भोयेगाव, बोरगाव, इरई, जैतापूर व मौजे पिंप्री धानोरा व उसगाव ही गावे तर मौजा कोठोडा परीसरातील गोविंदपूर, परसोडा, दुरगडी, शिवापूर, पार्डी, रुपापेठ, खडकी ही गावे समाविष्ट आहे. या परिसरातील गावांमध्ये बाधित जनावरे वगळता इतर गोवर्गीय जनावरांना प्रतिबंधक लसीकरण करावे.

Recommended read: चंद्रपूरात शिवसेनेचे रामदास कदम याचा प्रतिमेला जोडो मारो आंदोलन

चंद्रपूर जिल्ह्यातील जनावरांचे बाजार, यात्रा, पशुप्रदर्शने आदी पुढील आदेशापर्यंत स्थगित करण्यात आले आहे. साथीच्या काळात बाधित भागातील जनावरांचा निरोगी भागात प्रवेश प्रतिबंधित करण्यात येत आहे. तसेच बाधित गावामध्ये बाधित जनावरांचे विलगीकरण करून त्यांच्या पिण्याच्या पाण्याकरीता व खाण्याकरिता पशुपालकांनी स्वतंत्र व्यवस्था करावी.

रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामध्ये व रोग प्रादुर्भावग्रस्त क्षेत्रामधून पशुधनाची ऑनलाइन पद्धतीने होणारी खरेदी-विक्री व प्रत्यक्ष वाहतूक प्रतिबंधित करण्यात येत आहे.

Recommended read: आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन चंद्रपूरात आयोजित होणार भव्य माता महाकाली महोत्सव

गाई व म्हशींना स्वतंत्र ठेवणे, बाधित व अबाधित जनावरे वेगळी बांधणे तसेच या रोगाने ग्रस्त पशुधनाचा मृत्यू झाल्यास मृतदेहाची शास्त्रीय पद्धतीने पशुपालकांनी विल्हेवाट लावावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!