लम्पी बाधित गावाच्या पाच किलोमीटर परिसरातील क्षेत्र बाधित क्षेत्र घोषित

चंद्रपूर: महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात सद्यस्थितीत गोवंशीय जनावरांवर लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. चंद्रपूर व भद्रावती तालुक्यातसुध्दा जनावरांना लम्पीची लागण झाली आहे. लम्पी आजार आढळून आलेल्या चंद्रपूूर व भद्रावती तालुक्यातील ५ किलोमीटरच्या परिसरात लसीकरण करण्यास सुरूवात करण्यात आली आहे.

Recommended read: धक्कादायक…! सोमय्या पॉलिटेक्निक काॕलेज च्या इमारतीवरून विध्यार्थीनीचा उडी घेत आत्महतेचा प्रयत्न

लम्पी रोग हा विषाणूजन्य असून जनावरांच्या अंगावर १० ते २० मी.मी. व्यासाच्या गाठी, भरपूर ताप, डोळ्यातून व नाकातून चिकट स्त्राव, चारा पाणी कमी खाणे, दूध उत्पादनात घट अशी लक्षणे दिसतात.

चंद्रपूर जिल्ह्यातील शेणगाव येथे १५ सप्टेंबर रोजी लंम्पी रोगाचे ५ गोवंशीय जनावरांमध्ये लागण झाल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशाने शेणगाव येथे लम्पी स्कीन डिसीज बाधित क्षेत्र व रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून ५ किलोमीटर त्रिजेचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

Recommended read: निर्दयी बाप अवघ्या सात दिवसाच्या मुलीला रस्त्यात टाकून पळ काढतो तेव्हा…

सदर सतर्कता क्षेत्रात येणाऱ्या चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडा, वढा, घुग्गूस, म्हातारदेवी, सोनेगाव व अंतुर्ला तर भद्रावती तालुक्यातील मुरसा, मोहबाळा, या सात गावात व बाधित झालेला शेणगाव अशा एकूण ८ गावांमध्ये शीघ्रकृती दलामार्फत १६ सप्टेंबर रोजी एकूण १५४२ गोवंशीय जनावरांना लम्पी रोगाचे लसीकरण करण्यात आले. तसेच बाधित जनावरांचे रोगनिदान करण्याकरिता रक्तजल नमुने घेऊन औषधोपचार करण्यात आला आहे.

लम्पी त्वचा रोग हा औषधोपचाराने निश्चित बरा होत असून आजारी जनावरांचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत बाधित व सतर्कता क्षेत्रात मोफत लसीकरण व आजारी जनावरांना मोफत औषधोपचार शेतकऱ्यांच्या दारात करण्यात येत आहे.

Recommended read: सोमय्या पॉलिटेक्निक च्या प्राचार्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यां कडून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

ग्रामपंचायतीमार्फत जनावरे व गोठ्यांची फवारणी प्रतिबंधक उपाय म्हणून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

पशुसंवर्धन विभाग व जिल्हा यंत्रणेकडून सदर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय यंत्रणा सज्ज आहे. आजारी जनावरे औषधोपचार करून निश्चित बरे होतात. सदर रोग हा प्राण्यांमधून मनुष्याला संक्रमित होत नसल्यामुळे जनावरांचे दूध सेवनासाठी सुरक्षित आहे.

पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसीज आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेसोबत संपर्क साधावा अथवा पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!