चंद्रपूर शहरात आपची बॅनरबाजी, नागरिक विचारू लागले ‘क्या हुवा तेरा वादा’

चंद्रपूर: ‘देख रहा बिनोद, कैसे २०० युनिट का लॉलीपाप देकर चंद्रपूर कि जनता को मुर्ख बनाया गया’, ‘बेटा तुमसे ना हो पायेगा’ अशी प्रतिकात्मक बॅनरबाजी करीत आम आदमी पक्षाने चंद्रपूरचे आमदार किेशाेर जोरगेवार यांना २०० युनिट विज मोफत करण्याच्या आश्वासनाची आठवण करून दिली. चंद्रपूर शहरात लागलेले हे बॅनर चंद्रपूरकरांचे लक्ष वेधून घेत असून ‘क्या हुवा तेरा वादा’ असा प्रश्न आता नागरिक विचारू लागले आहे.

आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरकरांना २०० युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन देवून चंद्रपूर मतदार संघातून अपक्ष आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून आले. मात्र, निवडून येवून चार वर्षांचा कालावधी लोटला असतांनासुध्दा २०० युनिट मोफत मिळण्याबाबत कोणतीही हालचाली झाल्या नाही. त्यामुळे आम आदमी पक्षाने चंद्रपूर शहरात प्रतिकात्मक बॅनरबाजी करीत जोरगेवार यांना २०० युनिट विज मोफतची आठवण करून दिली आहे. ‘क्या हुआ तेरा वादा’, ‘बेटा तुमसे ना हो पायेगा’ यासह विविध प्रतिकात्मक बॅनर चंद्रपूर शहरभर लावण्यात आले आहे. हे बॅनर शहरातील गांधी चौक, जयंत टॉकीज, जटपुरा गेट, गिरणार चौक, नागपूर रोड यासह शहरभर लावण्यात आहे. त्यामुळे शहरातील सर्व नागरिकांचे लक्ष हे बॅनर लक्ष वेधून घेत आहे. त्यामुळे नागरिकही आता ‘क्या हुआ तेरा वादा’ असा प्रश्न आता विचारू लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!