गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्याने अनुदान मंजुर करण्यासाठी १० हजाराची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडून अटक करण्यात आली आहे. डॉ. सागर पोपट डुकरे असे लाचखोर पशुधन विकास अधिकाऱ्यांचे नाव आहे.

Recommended read: ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पाठविल्या शिफारसी

एका शेतकऱ्यांला कुक्कुटपालन अंतर्गत २ लाख २५ हजाराचे अनुदान मंजूर करून देण्यासाठी पशुधन विकास अधिकाऱ्याने १० हजाराची लाच मागितली. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना तक्रार केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सापळा रचून पशुधन विकास अधिकाऱ्यांस १० हजार रूपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. त्याच्यावर लाच प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

सदरची कारवाई लाच प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली होती.

One thought on “लाच घेतांना पशुधन विकास अधिकाऱ्यांस रंगेहाथ अटक”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!