तीन जणांचा बळी घेणारा बिबट जेरबंद - IG Media Chandrapur

वनविभागाने दिले होते बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

बेशुद्ध करून बिबट जेरबंद

चंद्रपूर: चंद्रपुरातील दुर्गापूर परिसरात १६ हल्ले करून अनेकांचे बळी घेणाऱ्या बिबट्याला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले आहे. शुक्रवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दुर्गापूर परिसरात वन विभागाने या बिबट्याला पकडले आहे. अखेर बिबट जेरबंद.

Recommended read: चंद्रपूर शहर महापालिकेचा जाहिरात फलक घोटाळा

दोन दिवसांपूर्वी बिबट्याने अडीच वर्षीय बालिकेला तोंडात पकडून नेलं होतं. मुलीच्या आईने बिबट्याशी झुंज देत लेकीची सुटका केली होती. या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनविभागाने काढले होते. या बिबट्याने दुर्गापूर, ऊर्जानगर परिसरात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. बिबट्याने लहान मुलांसह मोठ्या माणसांवरदेखील हल्ले करून अनेकांना जखमी केले होते. बिबट्याने तीन जणांचा नरडीचा घोट घेतला होता.

काही दिवसांपूर्वी आजोबांच्या अत्यसंस्कराला आलेल्या मुलाचा बळी याच बिबट्याने घेतला होता. तर मागच्याच आठवड्यात आरक्षा नावाच्या मुलीला आपले भक्ष बनविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र आईने त्या विपरीत परस्थितीतही हिंमतीने बिबट्यावर काठीने हल्ला करून मुलीचे प्राण वाचवले होते.

या घटनेनंतर दुर्गापूरवासियांचा आक्रोश टोकाला गेला व त्यांनी चक्क वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाच कुलूपबंद केले होते. या घटनेनंतर अखेर वन विभागाने बिबट्याला ठार करण्याचे आदेश दिले असतानाच बिबट्याला बेशुध्द करून जेरबंद करण्यात यश आले आहे.

Recommended read: दुर्गापूरात अडीच वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला

ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, वन परिक्षेत्र अधिकारी कारेकर यांच्या टीमने हे काम यशस्वी केले. यासाठी वन विभागाने सहा पिंजरे, कॅमेरा ट्रॅप, तथा ३०० वन कर्मचारी तैनात केले होते आणि अखेर तीन जणांचा बळी घेणारा बिबट जेरबंद करण्यात यश आलं.

2 thoughts on “तीन जणांचा बळी घेणारा बिबट जेरबंद”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!