बिबट पडला विहीरीत ब्रम्हपुरी bramhapuri news

अथक परिश्रमानंतर बिबट बाहेर काढण्यात यश

चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील सिंदेवाही – मेंडकी मार्गावरील किटाळी (बोद्रा) गावातील एका विहिरित बिबट पडल्याची घटना शुक्रवारी, ४ नोव्हेंबर रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास घडली. तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला विहिरीच्या बाहेर काढून जीवनदान देण्यात आले. शिकारीसाठी पाठलाग करतांना बिबट विहिरीत पडल्याचे सांगण्यात येत आहे.

Recommended read: विदर्भ राज्य आंदोलन: विदर्भातील खासदारांचे राजीनामे मागणार

सविस्तर वृत्तांत असे आहे की, ब्रम्हपुरी तालुक्यातील चारही बाजूने घनदाट अरण्याने व्याप्त असलेल्या किटाळी (बोद्रा) गावातील संतोष मेश्राम घराजवळील विहिरीमध्ये बिबट्या पडला होता. विहिरीमध्ये बिबट्याच्या डरकाळीचा आवाज विहिरीजवळ घर असलेल्या लोकांना आवाज ऐकू आला. कशाचा आवाज आहे म्हणून विहिरीजवळ जावून बघतात तर काय चक्क विहिरीत बिबट्या पडलेला होता. ही माहिती लगेच वनविभागाला देण्यात आली.

Recommended read: चंद्रपुरात ‘ M4U ‘ या कपड्याच्या दुकानाला भीषण आग

वनविभागाला माहिती होताच त्यांनी लगेच घटनास्थळाकडे धाव घेतली. तब्बल दोन ते तीन तासानंतर बिबट्याला सुखरूप विहिरीतून बाहेर काढण्यात वनविभागाला यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!