दुर्गापूरात अडीच वर्षे चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला

बिबट्याचा हल्ला मुळे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह वन कर्मचाऱ्यांना गावकऱ्यांनी डांबले

वनविभागाकडून बिबट्याला ठार मारण्याचे आदेश निर्गमित

चंद्रपूर: दुर्गापुर वॉर्ड नंबर 1 येथील अडीच वर्षीय चिमुकली वर बिबट्याचा हल्ला झाला. अंगणात उभी असताना बिबट्याने हल्ला करून तिला फरपटत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र आईच्या सतर्कतेने बिबट्याच्या तावडीतून चिमुकलीची सुटका झाली.

दरम्यान गावकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांसह वनविभागाच्या 10 कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले, जोपर्यंत त्या नरभक्षकाला ठार मारण्याचे आदेश वनविभाग देणार नाही तोपर्यंत वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोडणार नाही अशी भूमिका घेतल्याने 5 तासांच्या नाट्यक्रमानंतर वनविभागाच्या वतीने त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश जारी केले आहे.

Recommended read: लाच घेतांना पशुधन विकास अधिकाऱ्यांस रंगेहाथ अटक

रात्री 9.30 ची ही घटना आहे दुर्गापुर वॉर्ड नंबर 1 येथे वास्तव्यास असलेल्या कोपुलवार कुटुंबातील अडीच वर्षीय चिमुकली ही आपल्या आई समवेत अंगणात आली होती. याच परिसरात एक बिबट दबा धरुन बसलेला होता. आई लघुशंकेला जाताच बिबट्याने अंगणात असलेल्या चिमुकलीवर झडप घेतली. बिबट्या आपल्या जबड्यात चिमुकलीचा हात पकडून फरफटत नेत होता. एवढ्यात तिच्या आईचे लक्ष गेले. लगेच तिने आरडाओरड करून जवळच असलेल्या एका काठीने हातवारे केल्याने बिबट्याने चिमुकलीला ला सोडून पळून गेला. त्यात ती गंभीर जखमी झाली आहे. अक्षता कोपुलवार असे त्या अडीच वर्षीय जखमी मुलीचे नाव आहे.

Recommended read: गोंडवाना विद्यापीठातील प्रा. डॉ. प्रशांत सोनावणे यांच्या ‘ डिव्हाइस डिझाइनला ‘ भारत सरकारची पेटंट मान्यता प्रदान

वारंवार होणाऱ्या हल्ल्यामुळे दुर्गापुरातील नागरिक चांगलेच संतापले, वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल कारेकर व त्यांची चमू रात्री दुर्गापुरात पोहचला. मात्र, त्यावेळी त्यांना गावकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. गावकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यासह वनविभागाच्या 10 कर्मचाऱ्यांना डांबून ठेवले. जोपर्यंत त्या नरभक्षकाला ठार मारण्याचे आदेश वनविभाग देणार नाही तोपर्यंत आम्ही वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सोडणार नाही अशी भूमिका गावकऱ्यांनी घेतली.

5 तासांच्या नाट्यक्रमानंतर वनविभागाच्या वतीने त्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश वनविभागाने जारी केले आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कारेकर सहित असलेल्या 10 कर्मचाऱ्यांची सुटका केली.

2 thoughts on “दुर्गापूरात अडीच वर्षीय चिमुकलीवर बिबट्याचा हल्ला”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!