गाेंडपिंपरी तालुक्यातील घटना

नागरिकांनी ‘ निर्दयी बाप ‘ ला डांबले ग्रामपंचायतीमध्ये

चंद्रपूर: अवघ्या सात दिवसाच्या मुलीला रस्त्यावर टाकून बापाने पळ काढला. ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांनी ‘ निर्दयी बाप ‘ ला पकडले. त्याला थेट ग्रामपंचायत कार्यालायात डांबुन ठेवले.

मुलीला उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा येथे आज शनिवारी घडली. घटनेची माहीती पोलीसांना देण्यात आली.

Recommended read: वनविभागाचे कार्यालय फोडून चोरट्यांनी केली वाघाच्या पंजाची चोरी

पोलीसांनी वडीलाला ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोंडपिपंरी तालुक्यातील शिरशी बेरेडी येथील कुमोद पौरकर या यूवकाशी यांच्याशी विठ्ठालवाडा येथिल भाग्यश्री शालीक देवतळे हीचा विवाह झाला होता. या दोघांना सात दिवसापुर्वी मुलगी झाली.

Recommended read: शिवीगाळ, मारहाणप्रकरणी पुगलिया बंधूंसह १२ जणांवर गुन्हे

शनिवारला मुलीला बघण्यासाठी वडील कुमोद आला होता. या दरम्यान भांडण झालं. सात दिवसाचा मुलीला तो निघाला. भाग्यश्री मुलीला परत घेण्यासाठी त्याचा मागे मागे धावत होती. भाग्यश्री आणि तिच्या सोबत असलेल्यांनी आरडाओरड केली. तेव्हा भर रस्त्यात सात दिवसाचा मुलीला टाकून वडील पळू लागला. मात्र गावकर्यांनी त्याला पकडले. त्याला विठ्ठलवाडा ग्रामपंचायत कार्यालयात आणल्या गेलं.

Recommended read: लोहखनिज वाहून नेणारा ट्रक घरात घुसला

घटनेची माहिती गोंडपीपरी पोलिसांनी देण्यात आली. पोलीस घटनास्थळ कुमोद पौरकार यास ताब्यात घेतले.

मुलीला रस्त्यात टाकल्याने तिला दुखापत झाली आहे. मुलीची हालचाल बंद झाली होती. मुलीला उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. सध्या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!