चंद्रपुरातील OYO हॉटेलमध्ये वेशाव्यवसाय, एलसीबीची धाड

C and S OYO हॉटेल: एका महिलेला अटक, एकीची सुटका

चंद्रपूर : शहरातील ओमभवन जवळील गोकुल प्लासा येथील सी ॲण्ड एस OYO हॉटेलमध्ये वेशाव्यवसाय सुरु असल्याच्या माहितीवरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी दुपारी धाड टाकली. यावेळी एक महिला इतर एका महिलेमार्फत वेशा व्यवसाय करत असल्याचे आढळून आले.

पोलिसांनी वेशा व्यवसाय करुवून घेणाऱ्या महिलेला अटक केली. तर पीडित महिलेची सुटका केली.चंद्रपूर शहरात अनेक ठिकाणी ओयो हॉटेल उघडले आहेत.

Recommended read: जीर्ण इमारत कोसळून महिला जंखमी झाल्यानंतर चंद्रपूर महानगरपालिकेला जाग

नागपूर रोडवरील सी ॲण्ड एस OYO हॉटेलमध्ये एका अल्पवयीन मुलीकडून वेशाव्यवसाय करण्यात येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना एका संस्थेकडून मिळाली. त्यांनी लगेच आपले पथक घेऊन सी ॲण्ड एस ओयो केंद्रात धाड टाकली. यावेळी एक बनावट ग्राहक पाठवला. यावेळी एक महिला एका अन्य महिलेकडून वेशा व्यवसाय करत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्या पीडित महिलेची सुटका करुन वेशा व्यवसाय चालविणाऱ्या त्या महिलेला अटक करुन रामनगर पोलिसांच्या स्वाधीन केले.

Recommended read: दुर्गापूर हत्याकांड प्रकरणी दहा आरोपींना अटक

त्या महिलेवार PETA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी, स्थानिक गुन्हे शाखेचे बाळासाहेब खाडे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संदीप कापडे, अतुल कावळे यांच्यासह महिला पोलीस कर्मचारी व त्यांच्या पथकांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!