प्रेम प्रकरणातून प्रेयसीवर चाकू हल्ला, युवकाने स्वतःच्या हाताची कापली नस

चंद्रपूर: प्रेम प्रकरणातून गडचांदूर येथील एका युवकाने प्रेयसीवर चाकू हल्ला करून नंतर स्वतः च्या हातावर चाकूहल्ला करून जीव देण्याचा प्रयत्न केला. सदर घटना ऐतिहासिक माणिकगड किल्ल्यावर 23 मे ला दुपारी 1 च्या सुमारास घडली. या घटनेमुळे गडचांदूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

Recommended read: राज्यातील सर्वात वयोवृद्ध ‘वाघडोह‘ वाघाचा मृत्यू

प्रेयसीवर चाकू हल्ला :गडचांदूर येथील 21 वर्षीय युवक आपल्या प्रेयसीला सोबत घेऊन किल्ल्यावर आला होता. सदर युवकाने प्रेयसिकडे लग्नाची मागणी केली.परंतु प्रेयसीने प्रियकर ला लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्याने संतापलेल्या प्रियकर ने रागाच्या भरात युवतीच्या गळ्यावर चाकू हल्ला केला व नंतर स्वतः च्या हातावर चाकूहल्ला करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Recommended read : कळमना येथील पेपर मिलच्या लाकूड डेपोला भीषण आग

किल्ल्यावर फिरायला आलेल्या काही पर्यटकानी रक्ताने माखलेल्या युवक व युवतीला बघताच त्यांनी तेथील वनमजूरा ला बोलावून त्याच्या साहाय्याने किल्ल्यावरून दोघांनाही खाली आणले. जिवती पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून जखमी अवस्थेत असलेल्या दोघांनाही गडचांदूर ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर दोघांनाही चंद्रपूर येथे जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.सध्या दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे कळते. जिवती पोलिसांनी भादवी कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत

2 thoughts on “प्रेम प्रकरणातून प्रेयसीवर चाकू हल्ला, युवकाने स्वतःच्या हाताची कापली नस”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!