माता महाकाली महोत्सवाची परंपरा याच भव्यतेसह अविरत सुरू राहिल - आ. किशोर जोरगेवार

९९९ कन्या भोजन आणि महाप्रसादाने महाकाली महोत्सवाची सांगता

चंद्रपूर: महाराष्ट्राला धार्मिक परंपरा लाभली आहे. राज्यातील प्रमुख धार्मिक स्थळी पालखी यात्रेची प्रथा आहे. मात्र आम्हाला ही पंरपरा सुरु करायला थोडा वेळ झाला याची नक्कीच खंत आहे. मात्र सुरु झालेली ही महोत्सवाची परंपरा आणि यात महाकाली भक्तांचा लाभलेला सहभाग उत्साह वाढवणारा आहे. या महोत्सवाची इतिहास नोंद घेईल. माता महाकालीची पालखी यात्रेची सुरवात झाली याचा आनंद आहे. सुरु झालेली ही माता महाकाली महोत्सवाची परंपरा याच भव्यतेसह किंबहूणा यापेक्षा अधिक भव्यतेत अविरत सुरु राहील असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.

Recommended read: चंद्रपूरात पहिल्यांदाच श्री माता महाकाली महोत्सव

९९९ कन्याभोजन आणि महाप्रसादाने चार दिवसीय महाकाली महोत्सवाची सांगता करण्यात आली. या प्रसंगी माता महाकाली सेवा समितीचे अध्यक्ष अजय जयस्वाल, सदस्य बलराम डोडाणी, प्रा. श्याम हेडाऊ यांच्यासह माता महाकाली सेवा समीतीच्या पदाधिकााऱ्यांची उपस्थिती होती.

समारोपीय चौथ्या दिवशी माजी खासदार नरेश पुगलीया यांच्या हस्ते महोत्सव माता महाकाली मातेची आरती करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगवार, माजी नगरसेवक दिपक बेले, अशोक नागापूरे, गजानन गावंडे, ॲड. अविनाश ठावरी आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे आणि पोलिस अधिक्ष अरविंद साळवे यांनीही उपस्थिती दर्शवत माता महाकालीची आरती केली.

Recommended read: माता महाकाली पालखी नगर प्रदक्षिणा शोभायात्रेत उसळला भक्तीचा महासागर

समारोपीय कार्यक्रमात बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले की, चंद्रपूर शहरातुन माता महाकाली ची पालखी निघावी अशी जुनी इच्छा होती. मात्र कराेना प्रादुर्भाव वाढल्याने या नियोजनाला थोडा विलंब झाला. अखेर यंदा हा महोत्सव घेण्याचा निर्धार केला. आणि माता महाकालीच्या कृपेने फक्त १६ दिवसात इतके भव्य आयोजन करता आले. यात अनेकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग लाभला आहे. त्या सर्वांचे आभारही मंचावरुन आमदार किशोर जोरगेवार यांनी मानले.

महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेल्या श्री. माता महाकाली नगर प्रदक्षिणा पालखी शोभायात्रेत भक्तांनी दाखवेली लक्षवेधी उपस्थिती उत्साह, शक्ती, आत्मविश्वास वाढवणारी होती. यातुन पूढच्या वर्षी यापेक्षा भव्य आयोजन करण्याची उर्जा मिळाली आहे. केवळ महोत्सव आयोजन करुन आम्ही थांबणार नसुन माता महाकाली मंदिराचा सर्वांगीण विकास करण्याचा संकल्पही आम्ही केला आहे.

Recommended read: धक्कादायक… घुग्घुसमध्ये दिव्यांग मुलीवर अत्याचार

या कार्यक्रमात महोत्सवात सहकार्य करणाऱ्या सर्व सस्थांचा, व्यक्तींचा महाकाली सेवा समीतीच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमानंतर महोत्सव ९९९ कन्यांना भोजन देत त्यांना भेट वस्तु देण्यात आल्या. त्यानंतर महाप्रसादाला सुरवात झाली. यावेळी असंख्य नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

महाकाली महोत्सवा निमित्त बेटी बचाओ चा संदेश देण्यासाठी नवरात्रो उत्सवादरम्यान जन्मास आलेल्या कन्यांना महाकाली सेवा समितीच्या वतीने भेट स्वरूपात चांदीचा सिक्का देण्यात आला.

आ. किशोर जोरगेवार यांनी सर्वात मोठी शोभायात्रा काढत नवा पायंडा घातला – नरेश पुगलिया, माजी खासदार

आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन आयोजित चार दिवसीय माता महाकाली महोत्सव यशस्वी झाला आहे. या महोत्सवा निमित्त आमदार किशोर जोरगेवार यांनी सर्वात मोठी माता महाकालीची शोभायात्रा काढत नवा पायंडा घातला असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नरेशबाबु पुगलिया यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!