पडाेली पोलिसांनी हत्या चा संशयवारून दोेघांना घेतले ताब्यात

चंद्रपूर: पैशाच्या देवाणघेवाणाच्या वादावरून ३२ वषी्रय युवकांची लोखंडी रॉड डोक्यावर मारून हत्या केल्यानंतर मृतदेह लपविण्यासाठी आरोपींनी मृतदेहाला दगड बांधून विहीरीत फेकल्याची धक्कादायक घटना मंगळवारी ७ जून ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Recommended read: धावत्या DNR बसला आग

प्रविण विठ्ठल घिवे (३२) रा. मोरवा असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पडोली पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. मृतक व आरोपींमध्ये पैशाच्या देवाण-घेवाण वरून पडोली परिसरात वाद झाला होता. हा वाद इतका विकोपाला गेला कि, आरोपींने लोखंडी रॉडने प्रविण च्या डोक्यावर वार करून त्याला जागीच ठार केले. त्यानंतर मृतदेह कुणालाही दिसू नये यासाठी आरोपींनी पडोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागील भागात असलेल्या एका विहीरीत मृतदेहाला मोठा दगड बांधून फेकण्यात आले होते.

Recommended read: युक्रेनमधून परतलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सामावून घेण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

दरम्यान प्रविण बेपत्ता असल्याने कुटूंबियांनी पडोली पोलिसात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पडोली पोलिसांनी तपासाल गती दिली असता, मृतकांची दुचाकी आढळून आली. दुचाकी रक्ताने माखलेली होती. पोलिसांनी तांत्रिक तपास करून विहीरीत मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाला दगड बांधलेले असल्याने मृतदेह पाण्यावर तरगंत नव्हता. त्यामुळे पोलिसांनी पंपाव्दारे विहीरीतील पाणी उपसल्यानंतर मृतदेह ताब्या घेतला आहे. याप्रकरणी संशयावरून पडोली पोलिसांनी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अधिकचा तपास पडोली पोलिस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!