क्रिकेट बुकी सह तिघांचे अपहरण

तीन कोटींच्या खंडणीसाठी क्रिकेट बुकी सह अपहरण

आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथक गठीत

चंद्रपूर: ऑनलाईन क्रिकेट बुकी सट्टा व जुगाराचे रॅकेट चालविणाऱ्या प्रदीप गंगमवार व त्याचा मित्र राजेश झाडे या दोघांचे चौघांनी मिळून सरताज या मित्राच्या मदतीने अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

तीन काेटी रूपयांच्या खंडणीसाठी हे अपहरण केल्या गेले. दरम्यान अपहरणकर्त्यांचे तावडीतून गंगमवार व झाडे यांनी सुटका केली. सरताज व अन्य चौघे पळून गेले. अपहरणकर्त्या चौघांचा शोध घेण्यासाठी तीन शोप पथक तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी दिली.

Recommended read: स्वतंत्र जिल्हा निर्मितीत चिमूर ला प्राधान्य- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाकाली वार्ड चंद्रपूर येथील रहिवासी प्रदीप गंगमवार व महाकाली कॉलरी येथे राहणारे राजेश झाडे हे दोघेही लहापणीचे मित्र आहेत. या दोघांवर जुगाराचे गुन्हे दाखल आहेत. ऑनलाईन क्रिकेट सट्टा प्रकरणी गंगमवार यांना गडचिरोली पोलिसांसोबतच चंद्रपूर व इतर जिल्ह्यातील पोलिसांनी अनेकदा अटक केली आहे.

जुगाराचा छंद त्यांच्या जीवावर स्वातंत्र्य दिनी बेतला

पोलिसांनी जुगार खेळताना पकडू नये यासाठी हे दोघे वेगवेगळ्या ठिकाणी जुगार खेळतात. हा जुगाराचा छंद त्यांच्या जीवावर स्वातंत्र्य दिनी बेतला. जुगाराच्या या छंदात त्यांची ओळख खुनाच्या आरोपात १० वर्षे शिक्षा भोगलेला सरताज हाफिज यांच्यासोबत झाली होती. जुगार खेळण्यात झालेला मित्रचं त्यांच्या जीवावर उठला. प्रदीप गंगमवार यांच्याजवळ असलेली चारचाकी त्यांना चालवीता येत नसल्याने त्यांचा बालपणाचा मित्र राजेश झाडे त्यांच्या वाहनाचा सारथी होता.

१५ ऑगस्टला चंद्रपुरात मुसळधार असल्याने गंगमवार आपल्या घरी होते. त्याचवेळी राजेश यांनी बाहेर जुगार खेळायला जाऊया असे फोनवरून सांगितले. मात्र त्याचवेळी सरताज यांनी कॉल करून मला पण जुगार खेळायचा आहे असे सांगितले.

Recommended read: राजुराच्या वाहतूक नियंत्रकाची बल्लारपुरात

अपहरण

पावसात तिघेही जुगार खेळण्यासाठी निघाले, तुकुम ला पोहचल्यावर गाडी पार्क करीत असताना अचानक ४ अनोळखी इसमानी गाडीत प्रवेश करीत तिघांना चाकूचा व बंदुकीचा धाक दाखवीत धमकविले. मग चारचाकी वाहनात सुरू झाला अपहरणाचा प्रवास, त्या अनोळखी इसमांनी बंदुकीचा धाक दाखवीत गंगमदार याना ३ कोटी रुपयांची खंडणी मागितली. मात्र इतके पैसे नसल्याने त्यांनी हतबलता दाखवली असता राजेश झाडे हे मध्ये बोलल्याने एकाने त्यांच्या कानशिलात लगावली.

क्रिकेट बुकी ची अपहरणातून सुटका

गंगमवार यांनी ५० लाख रुपये देण्याची तयारी दाखवली. यासाठी त्यांनी यवतमाळ येथील मित्राला फोन केला. मात्र पैसे १६ ऑगस्टला मिळेल असे सांगितले असता त्या ४ आरोपीनी वाहन मूल मार्गे सिंदेवाही, नागभीड व उमरेड मार्गे थेट नागपूर पोहचले. वाटेत उमरेडला पोहचल्यावर चार पैकी १ त्याठिकाणी उतरला, नंतर गाडी पहाटे ३ च्या सुमारास मोमीनपुरा येथे दाखल झाली, तिघांपैकी एकाला सिगारेट पिण्याची तलब आली. गाडी थांबविण्यात आली, पण गाडी त्यावेळी अनलॉक होती. याचा फायदा घेत राजेश झाडे हा गाडीच्या खाली उतरत वाचवा वाचवा ओरडू लागला. नागरिक राजेश कडे धावले, नागरिकांची गर्दी जमा होत असताना आरोपीने राजेश ला पकडण्याचा प्रयत्न केला, हातापायी सुद्धा झाली मात्र त्यावेळी मोमीनपुरा येथे पोलीस असल्याने त्यांनी तात्काळ राजेश ला सोडविले.

Recommended read: चंद्रपूरातील प्रसिद्ध चढ्ढा ट्रान्सपोर्ट कंपनीच्या कार्यालयावर छापा

अपहरणाचा कट फसला असे वाटताच आरोपीनी तिथून पळ काढला त्यांच्यासोबत सरताज ने ही पळ काढला. पोलिसांनी तात्काळ राजेश व प्रदीप ला पोलीस ठाण्यात आणून विचारपूर केली असता त्यांनी घडलेला सर्व प्रकार सांगितला. गंगमवार यांच्या तक्रारीची नोंद घेत गुन्हा दाखल केला.

अपहरण व खंडणीच्या कटामागे सरताज असल्याची जाणीव प्रदीप ला झाली, आरोपींनी ज्यावेळी घटनास्थळवरून पळ काढला त्यावेळी गाडीत २ मोबाईल, बंदूक व गुप्ती आढळली त्या सामानाची चौकशी केली असता ते सरताज हाफिज यांचेच असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी तीन पथक गठीत केले आहे. आरोपींचा कसून शोध सुरू असल्याची माहिती पोलीस अधिक्षक साळवे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!