आवळगावात धुमाकूळ घालणारा K-4 वाघ जेरबंद

K-4 वाघ : बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन देवून केले जेरबंद

चंद्रपूर: ब्रम्हपुरी वनविभागातील दक्षिण ब्रम्हपुरी वनपरिक्षेत्रातील आवळगांव शेतशिवारात धुमाकूळ घालून अनेकांना जखमी केलेल्या K-4 वाघ ब्रम्हपुरी वनविभागाच्या पथकाने बेशुध्दीचे इंजेक्शन देवून वाघास जेरबंद करण्यात यश आले आहे.

Recommended read: चांदाफोर्ट-गोंदिया रेल्वे बंद झाल्याने शेकडो प्रवाशी जंगलातून रूळाच्या मार्गांने निघाले

दक्षिण ब्रम्हपुरीच्या आवळगाव परिसरातील कक्ष क्रमांक १०४७ मध्ये के-४ या नर वाघाने धुमाकूळ घालून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. या वाघाने नागरिकांवर हल्ला सुध्दा केला आहे. त्यामुळे ब्रम्हपुरी वनविभागाचे पथक, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, शॉर्पशुटर अजय मराठे यांनी वाघाला बेशुध्दीकरणाचे इंजेक्शन दिले. त्यानंतर वाघ बेशुध्द झाल्यानंतर सायंकाळी ७.२२ वाजताच्या सुमारास वाघाला सुरक्षितरितया पिजऱ्यांत जेरबंद करण्यात आले आहे.

Recommended read: लॉजवर तरुण-तरुणींचे अश्लील चाळे

जेरबंद करण्यात आलेला के-४ हा नर वाघ दोन ते अडीच वर्षाच्या असून त्याला चंद्रपूर येथील प्राणी बचाव केंद्रात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. सदरची कारवाई सहायक वनसंरक्षक के.आर.धोंडणे, वनक्षेत्रपाल आर.डी.शेंडे, यांच्यासह ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पथकाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!