https://igmedias.com/isro-team-in-chandrapur/

चंद्रपूर – काही दिवसांपूर्वी पडलेल्या उपग्रहाच्या अवशेषांची पाहणी करण्यासाठी अखेर इस्त्रोची टीम चंद्रपूरात दाखल झाली आहे. याबाबतची पाहणी ते करीत आहेत. त्यांच्या या अभ्यासानंतरच या अवशेषांबाबत स्पष्ट माहिती मिळू शकणार आहे.

Recommended read: अल्पवयीन प्रेयसीची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी जमिनीत पुरला मृतदेह

2 एप्रिलला रात्री आकाशातून उपग्रहाचे अवशेष चंद्रपूर जिल्ह्यात विविध ठिकाणी कोसळले. सिंदवाही, सावली, ब्रम्हपुरी आणि चिमूर तालुक्यात हे अवशेष क्रमाक्रमाने आढळून आले होते. सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी या गावात एक 400 किलोची रिंग कोसळली होती. तर यानंतर पवनपार गावातील जंगलात एक धातूचा गोळा आढळून आला होता. यानंतर अनेक ठिकाणी हे गोळे आढळून आले. हे सर्व अवशेष शासकीय कार्यालयात जमा करण्यात आले. याबाबत जिल्हा प्रशासनाने इस्त्रो या भारतीय अंतराळ शोध संस्थेशी संपर्क करून याची माहिती दिली होती. त्यानंतर इस्त्रोची टीम येथे अभ्यास करण्यासाठी दाखल होणार हे स्पष्ट झाले होते. इस्रोची टीम चंद्रपुरात आली.

इस्रोची टीम चंद्रपुरात पाहणी करतांना

त्यानुसार आज इस्त्रोची तज्ज्ञ टीम आज (शुक्रवार) चंद्रपुरात दाखल झाली. सर्वप्रथम या टीम ने सिंदवाही पोलीस ठाण्यात जमा असलेल्या उपग्रहाच्या अवशेषांची पाहणी केली. तसेच स्थानिक लोकांशी चर्चा केली. ही टीम आता जिथे जिथे अवशेष सापडले आहेत, तिथे भेट देणार आहे. त्यानंतर हे सर्व अवशेष अभ्यासासाठी घेऊन जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यानंतर अंतराळात घडलेल्या घटनेबाबत उलगडा होऊ शकणार आहे.

One thought on “इस्त्रोची टीम चंद्रपुरात दाखल, आकाशातून पडलेल्या वस्तूची केली पाहणी”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!