सहा चोरट्यांना अटक, चोरट्यांमध्ये दोन महिलांचा समावेश

चंद्रपूर: रामनगर पोलिस स्टेशन समोरील एसबीआय बँकसमोर मोनीश शिवकुमार बघेल या युवकांकडून काही चोरट्यांनी ११ लाख १० हजार चारचाकी गाडीतून लंपास केले.

रामनगर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने चार महिण्यांच्या अश्रक परिश्रमाने सहा चोरट्यांना अटक केली असून यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे.

Recommended read: माता महाकाली पालखी नगर प्रदक्षिणा शोभायात्रेत उसळला भक्तीचा महासागर

पी.एच.बाबु शंकररैया छल्ला, सी.एच.अलेक्झांडर रमेश छल्ला, सी.एच.प्रसंगी येल्लीया सन्नी छल्ला, ननी नागेश्वराव येरगदीमल्ला, कल्पना किशोर कुन्चाला, बाबु गोगुल्ला रा. कपराल्ला, जिल्हा नेल्लोर आंध्रपदेश असे अटकेतील आरोपींची नाव आहे.

चारचाकी वाहनातून ११ लाख लंपास

आरोपींनी बघेल यांना चारचाकी वाहनातून ऑईल लिंकेज होत असल्याची खोटी बतावणी करून त्यांचे ध्यान विचलित करून गाडीत ठेवलेली ११ लाख १० हजार रूपये लंपास केले. दरम्यान बघेल यांनी रामनगर पोलिस ठाण्यात घटनेची तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सीसीटिव्ही व तांत्रिक अभ्यास करून चोरी झाल्याच्या चार महिण्यानंतर सहा आरोपींना चंद्रपूर रेल्वे स्थानकातून अटक केली आहे.

Recommended read: धक्कादायक… घुग्घुसमध्ये दिव्यांग मुलीवर अत्याचार

आरोपींकडून दोन दुचाकी, १२ सीमकार्ड, तीन मोबाईल, १० हजार रूपये रोख जप्त करण्यात आले आहे. सदरचे चोरटे हे परिसराची रेखी केल्यानंतरच चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अरविंद साळवे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनात रामनरचे पोलीस निरीक्षक राजेश मुहे, सहाय्यक पोलिस निरीक्षक हर्षल एकरे, पोलिस उपनिरीक्षक विनोद भुरले, रजनीकांत पुठ्ठावार, पेतरस सिडाम, प्रशांत शेंदरे यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!