१०३ किलो गांजा जप्त

चंद्रपूर: गडचिरोली जिल्ह्यातून आंतरराज्यीय गांजा तस्कर दोन चारचाकी वाहनाने परराज्यातून गांजा घेऊन चंद्रपुरात येत असतांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचुन मुल चंद्रपुर रोडवर चिचपल्ली गावजवळील शेर-ऐ पंजाब ढाब्याजवळ दोघांना अटक केली. त्यांच्याकडून १०३ किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. श्रीनिवास नरसय्या मचेडी, शंकर बलय्या घंटा, मस्जीद वाडा, सुभाषनगर, मथनी, करीमनगर, तेलंगणा असे अटकेतील आरोपींचे नाव आहे.

गुप्त माहितीच्या आधारे शेर-ऐ-पंजाब ढाब्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून दोन वाहनांना ताब्यात घेतले. वाहनांची दोन पंचासमक्ष झडती घेतली असता दोन्ही वाहनांमध्ये ५१ पाकिटांमध्ये मिळुन १०३ किलो ८३९ ग्रॅम वजनाचा ३१,लाख १५ हजार १७० रुपयांचा गांजा आढळून आला. तसेच सदर गांजा वाहतुकीतील दोन वाहने असा एकूण ४१ लाख १५ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपीतांविरुध्द कलम ८ (क), २०(ब) (II) (क) एन.डी.पी.एस. अॅक्ट नुसार पोलीस ठाणे रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप कापडे, सचिन गदादे सोबत स.फौ. राजेंद्र खनके, रमेश तोकला, पो.हवा. नितीन साळवे, प्रकाश बलकी, संजय आतकुलवार ना.पो. शि. सुभाष गोहोकार यांच्या पथकाने केली आहे.

One thought on “आंतरराज्यीय गांजा माफियांना अटक स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!