चंद्रपूरात सापडला " हळे कन्नड " लिपीतील शिलालेख

हळे कन्नड लिपीतील विदर्भात सापडलेला हा पहीलाच शिलालेख

चंद्रपूर: चंद्रपूरचा इतिहासात भर घालणारी घटना नुकतीच घडली.जिल्ह्यातील नलेश्वर-दाबगाव मार्गाचे खोदकाम करीत असतांना विरगड आढळले.या विरगडावर ” हळे कन्नड ” लिपीतील शिलालेख कोरलेला आहे. विदर्भात सापडलेला हळे कन्नड लीपीतील हा एकमेव शिलालेख ठरला आहे.शिलालेखाचे वाचन झाल्यास मराठी-कन्नड संस्कृतीवर नवा प्रकाश पडणार आहे.

Recommended read: सर्व राजकिय पक्षांनी ओबीसी आरक्षणाकरीता सर्वानुमते आवाज उठवावा -ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे

जिल्ह्यातील नलेश्वर या गावाला प्राचीन इतिहास लाभला आहे.नलेश्वर गावापासून जवळच गायमुख येथे गोंडकालीन मंदीर,अनेक शिल्पे विखूरले आहेत.गावाचा ऐतिहासिकतेत पुन्हा भर पडली आहे.नलेश्वर-दाबगाव मार्गाचे खोदकाम करतांना प्राचीन विरगड सापडला. या विरगडावर दोन शिल्प कोरले आहेत. विरगडाचा वरचा भागावर पंख असलेली स्त्री हात जोडून उभी असलेलं शिल्प कोरलं आहे तर दुसऱ्या शिल्पात घोड्यावर बसलेल्या हातात तलवार असलेल्या सैनिक दिसत आहे.

विरगडाचा उजव्या बाजूनी तेरा ओळींचा शिलालेख आहे.शिलालेख हळे कन्नड लिपीतील आहे.शिलालेख आठव्या अथवा नवव्या शतकातील असावा असा अंदाज इतिहास अभ्यासक निलेश झाडे यांनी मांडला आहे.आठव्या-नवव्या शतकातील मराठी-कन्नड संस्कृतीवर हा शिलालेख प्रकाश पाडू शकतो. लिपीतील सापडलेला हा शिलालेख कदाचित विदर्भातील ही एकमेव असावा.शिलालेखाचे वाचन झाल्यास चंद्रपूरचा इतिहासावर नव्याने प्रकाश पडू शकतो.

2 thoughts on “चंद्रपूरात सापडला “हळे कन्नड” लिपीतील शिलालेख”
  1. […] उठवावा -ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे चंद्रपूरात सापडला “हळे कन्नड” लि… ओबीसीच्या संविधानिक न्याय […]

  2. […] उठवावा -ओबीसी नेते डॉ. अशोक जीवतोडे चंद्रपूरात सापडला “हळे कन्नड” लि… ओबीसीच्या संविधानिक न्याय […]

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!