गोंदिया : घरात झोपलेल्या दोन भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा खुर्द येथे घडली. या घटनेची माहिती होताच शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी देव्हाडा खुर्द येथे धाव घेतली. सुशील बलवीर डोंगरे (वय ८) व उत्कर्ष बलवीर डोंगरे (वय ११) असे मृत भावंडांचे नाव आहे.

Recommended read: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर रशिया दौर्‍यावर रवाना

दोन्ही भाऊ रविवारी रात्री एकाच बिछान्यावर झोपले होते. रात्री मागच्या दारातून साप आत आला. तो बिछान्यावर चढला व त्याने दोघाही भावांना दंश केला. काहीतरी चावल्याचा भास झाल्याने जाग आली. पाहिले असता साप चावल्याचे लक्षात आले.

दोघाही भावांना आधी तुमसर येथील शासकीय रुग्णालयात व नंतर भंडारा येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, थोरला भाऊ उत्कर्ष याचा रात्री मृत्यू झाला.

Recommended read: जमिनीच्या वादातून लहान भावाने केली मोठ्या भावासह वहिणीची हत्या

धाकटा सुशील याला रात्रीच नागपूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्याचा देखील आज सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. चिमुकल्या भावंडांचा सर्पदंशाने मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!