मिसाईल चुकून पाकिस्तान सिमेत धडकले- IG Media Chandrapur

मिसाईल अनियंत्रित, जिवीत हाणी टळली

नवी दिल्ली: मिसाईल तपासणी दरम्यान भारताकडून चुकून एक मिसाइल अनियंत्रित झाल्याने पाकिस्तानात जाऊन पडले आहे. या प्रकारामुळे भारताने खेद व्यक्त केला असून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश जारी केले आहे. याप्रकरणी पाकिस्तानने दुतावासाला पाचारण करून घटनेबद्दल रोष व्यक्त केला आहे.

Recommended read: सीआरपीएफ जवानाची गोळ्या घालून आत्महत्या

एक भारतीय मिसाईल पाकिस्तानच्या हवाई हद्दीत शिरलं आणि ते मियाँ चन्नू भागात कोसळल्याने त्या भागात थोडं नुकसान झालं आहे. याबद्दल भारतीय संरक्षण मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नसल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!