युक्रेनमधून भारतात आलेल्या 1319 विद्यार्थ्यांकडे तब्बल 121.6 कोटीचे कर्ज कसे फेडायचे

कर्ज कसे फेडायचे विद्यार्थांना प्रश्न, सरकारने स्पष्ट केली भूमिका

नवी दिल्ली: रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरूच आहे. या युद्धाचा फटका अर्थव्यवस्थेला बसला आहे. तेवढाच फटका युक्रेनमधून भारतात परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना बसला आहे. युक्रेनमधून भारतात आलेल्या 1 हजार 319 विद्यार्थ्याकडे तब्बल 121.6 कोटी रुपयांचे कर्ज आहे. कर्ज कसे फेडायचे असा प्रश्न विद्यार्थांना पडला आहे.

Recommended read: आठ वर्षीय ध्रुवची ‘ इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ‘ मध्ये नोंद

युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेनमध्ये अडकलेल्या जवळपास सर्वच भारतीय विद्यार्थ्यांना आपल्या देशात आणण्यात यश आले आहे. मात्र या विद्यार्थ्यांसमोर सध्या एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे शैक्षणिक कर्जाची परतफेड कशी करायची? जे भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये उच्चशिक्षणासाठी गेले होते, त्यांनी आपल्या शिक्षणासाठी लाखो रुपये कर्ज घेतले आहे. मात्र शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागल्याने हे शैक्षणिक लोन (Education Loan) आता परत कसे फेडायचे असा प्रश्न या विद्यार्थांना पडला आहे.

याबाबत सरकारच्या वतीने संसदेत माहिती देण्यात आली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार भारतातून युक्रेनमध्ये गेलेल्या एकूण 1319 विद्यार्थ्यांनी 121.6 कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. या विद्यार्थ्यांना 21 खासगी बँकांनी कर्ज दिले आहे.युक्रेनमधून भारतात परतलेल्या विद्यार्थ्यांवर एकूण 121.6 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या विद्यार्थ्यांना युद्धामुळे आपले शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले आहे. या विद्यार्थ्यांकडे डिग्री नसल्यामुळे आता हे विद्यार्थी कर्ज कसे फेडणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यावर बोलताना केंद्र सरकारने म्हटले आहे की, सध्या आम्ही युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आढावा घेत आहोत. रशियाकडून युक्रेनवर करण्यात आलेल्या हल्ल्यांमध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. युक्रेनमध्ये परिस्थिती कधी सामान्य होणार याबाबत निश्चित सांगता येणार नाही. मात्र लवकरच याबाबतीत योग्य तो निर्णय घेऊ. काँग्रेस खासदार रवनीत सिंह यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना केंद्र सरकारकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!