भद्रावती येथील शासकीय आयटीआय समोरील घटना- IG Media Chandrapur

भद्रावती येथील शासकीय आयटीआय समोरील घटना

अत्याचार करून खून करण्यात आल्याची परिसरात चर्चा

चंद्रपूर: भद्रावती शहरातील सुमठाणा– तेलवासा रोड मार्गावरील शासकीय आयटीआय समोरील झाडे यांच्या शेतात एका अंदाजे २५ वर्षीय युवतीचे धडावेगळे निवस्त्र अवस्थेत शव आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. अत्याचार करून खून करण्यात आल्याची चर्चा परिसरात आहे.

Recommended read: अवकाशातून पडलेली वस्तू सॕटेलाईटची मोठी रिंग

भद्रावती येथील काही नागरिक फिरण्यासाठी गेले असता, त्यांना एका युवतीच मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक अरिवंद साळवे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांचे पथक दाखल होवून पंचनामा करण्यात आला आहे. डी एन ए टीम चाचणी केल्यानंतर युवतीची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिसांनी पंचनाम्यानंतर युवतीचे मृतदेह चौकशीसाठी पाठवण्यात आला आहे. अत्याचार केल्यानंतर खून करण्यात आल्या असल्याचे परिसरात बोलले जात आहे. त्यामुळे पोलिसांनी देखील यादृष्टीने तपासाला गती दिली आहे.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!