गोंडपिपरीत मक्का खरेदी केंद्राचा शुभारंभ प्रकरण
गोंडपिपरी :-उद्योगविरहित गोंडपिपरी तालुक्याची मदार शेतीवर आहे. शेती,शेतीपूरक व्यवसाय आणि शेतमजूरी करुन तालुक्यातील नागरिक जीवन जगतात. धान,कापूस,तुळ,मक्का यासारख्या पिकांचे उत्पन्न घेऊन येथिल नागरिक आपले जिवनमान उंचावण्याचा प्रयत्न करित आहेत.यातून कुटूंबाचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी त्यांचा रोजचा संघर्ष सुरु आहे.असे असतांना मात्र तालुक्यात उत्पन्न होणाऱ्या मालाला खरेदी केंद्र नसल्याने शेतकऱ्यांना विक्रीसाठी भटकावे लागते.
गोंडपिपरी तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे मक्का खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी बाजार समितीच्या नवनियुक्त संचालकांनी केली होती. माजी जि. प. सदस्य अमर बोडलावार यांच्या नेतृत्वात जिल्ह्याचे पालकमंत्री ना सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन देत मागणी रेटून धरली. या पाठपुराव्याला यश आले असून आजपासून (दि.८) गोंडपिपरी मक्का खरेदी केंद्राचा शुभारंभ होत आहे.
Recommended read: ताडोबात ‘विरा’ वाघिणीने दिला दोन बछड्यांना जन्म- पर्यटकांना वाघिणीसह बछड्यांचे दर्शन
यावेळी उद्घाटक म्हणून राजूरा विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार अॕड.संजय धोटे,कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार सुदर्शन निमकर राहणार आहेत. प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमर बोडलवार आणि भाजपचे तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक बबन निकोडे आदिंची उपस्थिती राहणार आहे.तेव्हा या खरेदी केंद्राचा लाभ घेण्याचे आव्हाहन गोंडपिपरी केषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ईंद्रपाल धूडसे,उपसभापती स्वप्निल अनमुलवार,सचिव अनिल चौधरी यांचेसह संचालक मंडळांनी केला आहे.

विद्यमान आमदाराला डालवून उद्घाटनाला भाजपचे माजी आमदार अॕड.धोटे, निमकर यांची उपस्थिती
प्रोटोकॉल नुसार हा कार्यक्रम होत नसल्याने सहा संचालकांनी सभापती यांच्याकडे निवेदन देत या कार्यक्रमावर आक्षेप घेतला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत उद्यापासून सुरू होत असलेल्या शासकीय मक्का खरेदी केंद्राचे उद्घाटन प्रोटोकॉल नुसार जिल्ह्याचे पालकमंत्री, विधानसभेचे आमदार किंवा येथील स्थानिक शासकीय अधिकारी तसेच बाजार समितीचे सभापती व उपसभापती यांच्याकडून होणे अपेक्षित होते मात्र बाजार समितीवर भाजप ची सत्ता असलेल्या सभापती उपसभापती व संचालकांनी कुठलीही बैठक न बोलविता इतर संचालकांना विश्वासात न घेता हा कार्यक्रम ठरवला व प्रोटोकॉल न पाडता कुठल्याही शासकीय पदावर नसलेल्या पक्षाच्या नेत्याकडून कार्यक्रमाचे उद्घाटन तथा अध्यक्ष स्थान दिल्या जात आहे ही बाब नियमाला उल्लंघन करणारी असल्याकारणाने कृषी उत्पन्न बाजार समिती येथील संचालक अशोक रेचनकर, निलेश संगमवार, देविदास सातपुते, प्रेमिला चणेकर ,नारायण वागदरकर व संतोष बंडावार या सहा संचालकांनी उद्या होत असलेल्या कार्यक्रमावर आमचा आक्षेप असून नियमबाह्य असलेल्या कार्यक्रमाबाबत माननीय सभापती इंद्रपाल धूडसे कृ.ऊ.बा.स. गोंडपिपरी यांना निवेदन दिले.
[…] […]