आजाद बागीचा लोकार्पण सोहळा संपन्न- IG Media Chandrapur

आजाद बागीचा लोकार्पण सोहळा संपन्न

चंद्रपूर: चंद्रपूर शहरातील नागरिकाकरिता महानगरपालिकेद्वारे उत्कृष्ट असा आझाद बगीचा तयार केला आहे. मात्र काही लोकांकडून त्याला राजशिष्टाचार याचे नाव देऊन राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्वांची सुरुवात आयुक्त मोहिते यांनी केली आहे.

Recommended read : आंतरराज्यीय गांजा माफियांना अटक चंद्रपूर शहर

ज्या कुणी ही व्यक्तीने ही आग लावली असेल ती आग मुनगंटीवार विझविणार असल्याचे वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केले. लोकलेखा समितीचे प्रमुख तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आजाद बगीच्या चे उद्घाटन झाले त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना मुनगंटीवार म्हणाले की आम्ही कधी श्रेयवाद लाटला नाही. खनिज विकास निधीतून रुग्णवाहिका लोकार्पण करण्यात आले त्यावेळी माझे नाव टाकण्यात आले नव्हते त्यावेळी आम्ही काही बोललो नाही. चंद्रपूर महानगरपालिकेने आझाद बगीचा लहान मुलांकरिता वयोवृद्ध करिता चंद्रपूर शहरातील नागरिकांकरिता तयार केला असताना त्यात बाधा आणण्याचे काम केले जात आहे. या सर्वांची सुरुवात आयुक्त मोहिते यांनी केली आहे. ज्या कुण्या व्यक्तींनी ही आग लागली आहे ती आग विझविण्याचे काम मुनगंटीवार करणार असल्याचे ते म्हणाले.

3 thoughts on “ज्या व्यक्तीने आग लावली आहे ती आग मी विझविणार- सुधीर मुनगंटीवार”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!