मानव-वन्यजीव संघर्ष : वाघाने घेतला चार दिवसात चार जणांचा बळी

चोवीस तासात दोन वाघांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह

चंद्रपूर: दक्षिण मध्य रेल्वेच्या दिल्ली ते चेन्नई रेल्वे मार्गावर राजुरा पासून आठ किलोमीटर अंतरावर चनाखा गावाशेजारी रेल्वेने धडक दिल्याने एका वाघाचा मृत्यू झाल्याची घटना गुरूवारी रात्री घडली. दरम्यान गुरूवारी सकाळी बल्लारपूर वनविभागात एका नर वाघाचा मृतदेह आढळून आला होता. वनमंत्र्यांच्या गृहजिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष शिगेला आला.

Recommended read: शिक्षकांची दिवाळी होणार गोड

अवघ्या चोवीस तासात दोन वाघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे चंद्रपूरात मानव वन्यजी संघर्ष अधिक तीव झाला असून चार दिवसात चार जणांचा वाघाने बळी घेतला आहे. तर, एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे.

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या गृहजिल्ह्यात मानव-वन्यजीव तीव्र होत असून वाघाचा मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यामुळे वनमंत्री मुनगंटीवारांनी यावर कृती आराखडा तयार करून तोडगा काढावा अशी मागणी होवू लागली आहे.

Recommended read: बार्टी प्रमाणे महाज्योतीमध्ये ओबीसींच्याच संस्थांना प्राधान्य देण्यात यावे- राजूरकर

रेल्वेच्या धडकेत वाघाचा मृत्यू झाल्याची माहिती कळताच उप वनसंरक्षक श्वेता बोड्डू, उपविभागीय वन अधिकारी अमोल गर्कल, वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड यांनी भेट दित पाहणी केली. राजुरा वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय अंतर्गत येणाऱ्या चुनाळा वनक्षेत्र परिसरातून रेल्वे लाईन गेली आहे.

आज सकाळी रेल्वे गँगमन गस्त घालीत असताना त्याला रेल्वे रुळाशेजारी वाघ मृत्युमुखी पडल्याचे दिसून आले. त्यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. रेल्वे विभागाने राजुरा वन विभागाला माहिती दिली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश येलकेवाड आणि क्षेत्र सहायक प्रकाश मत्ते घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. ही वाघीण असून अंदाजे चार ते साडे चार वर्षाची असल्याचे वन अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!