चंद्रपूर: पत्नीला गावाला सोडून परत येताना झालेल्या चारचाकीच्या अपघातात पतीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दुपारी 2.30 वाजताच्या सुमारास सावली गडचिरोली मार्गांवरील सुरभी कृषी विद्यालयाच्या शेताजवळ घडली. देवीलाल रुपलाल यादव (34) रा. भंडारीपाला कॅकर छत्तीसगड हल्ली मुक्काम मूल असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

रुपलाल यादव हा आकापूर येथील एमआयडीसी येथे कामावर होता. मागील दहा दिवसापूर्वी देवीलालला मुलगी झाली. रुग्णालयातून सुट्टी झाल्यामुळे तो दोन दिवसापूर्वी आपल्या पत्नीला मित्राच्या एमएच 33 डीसी 2282 क्रमांकाच्या आय 20 कारने आपल्या मूळ गावी छत्तीसगड येथे घेऊन गेला होता. पत्नी व मुलीला सोडून आज सकाळी परत निघाला. दरम्यान सावली कृषी महाविद्यालयाच्या शेताजवळ त्याचे वाहनावरील नियंत्रण सुटले कार रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाली यावेळी तो वाहणातून खाली कोसळला. त्याच्या डोक्याला जब्बर मार बसला दरम्यान धावती कार विद्युत पोलला धडकल्याने पेट घेतला. व जळून खाक झाली. घटनेची माहिती सावली पोलिसांना मिळताच सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर व त्यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मार्ग दाखल केला आहे.

One thought on “धावत्या कारची विद्युत खांबाला धडक, युवकाचा जागीच मृत्यू, कार जळून खाक”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!