होम स्टे मालकांकडून २००० हून अधिक जोडप्याचे छुप्या कॅमेऱ्याव्दारे चित्रीकरण

छुप्या कॅमेऱ्याव्दारे खाजगी क्षणाचे चित्रीकरण

लॉज मध्ये जाणाऱ्यांनो सावधान

वॉशिंग्टन : होम स्टे चालकांनी एक-दोन नव्हे, तर तब्बल २००० हून अधिक जोडप्यांच्या रूममधील खासगी क्षणांचे व्हिडीओ चित्रिकरण (Obscene Video) केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. सदरचा प्रकार अमेरिकेच्या टेक्सास शहरात घडला आहे.

एअरबीएनबी (Airbnb) या प्रख्यात ऑनलाईन कंपनीचा होस्ट असलेल्या आरोपीने आपल्या होम स्टे अतिथीगृहात थांबलेल्या हजारो पाहुण्यांवर पाळत ठेवून त्यांना नको त्या अवस्थेत चित्रित केल्याचा दावा केला जात आहे. Airbnb कंपनी सुट्टीनिमित्त बाहेरगावी आलेल्या प्रवाशांना होमस्टे उपलब्ध करुन देते. पाहुण्यांच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ-फोटो शूट करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Recommended read: चंद्रपूरात सापडला “हळे कन्नड” लिपीतील शिलालेख

‘मेट्रो’ वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार ५४ वर्षीय आरोपीचं नाव जय एली आहे. त्याने आपल्या होम स्टेमधील रुममध्ये सिक्रेट कॅमेरा सेटअप केला होता. त्याव्दारे अनेक जोडप्याचे खाजगीतले छायाचित्र व चित्रीकरण केले आहे. पोलिसांनी जयकडून कॅमेरा, लॅपटॉप, टॅब आणि फोन जप्त केला आहे. गेल्या वर्षभरापासून तो व्हिडीओ चित्रिकरण करत असल्याचं समोर आलं आहे.

नोव्हेंबर महिन्यात पोलिसांनी जय एलीला अटक केली होती. चार प्रकरणांमध्ये तेव्हा तो आरोपी होता. मात्र आता त्याच्यावर १५ प्रकरणांमध्ये केस दाखल करण्यात आली आहे.

होम स्टेमध्ये राहायला आलेल्या पाहुण्यांच्या गोपनीयतेचा भंग केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सोबतच त्यांच्या भावनांना धक्का पोहोचवल्याचाही आरोप करण्यात येत आहे. एलीच्या वकिलांनी मात्र जय निर्दोष असल्याचं सांगितलं आहे.

2 thoughts on “होम स्टे मालकांकडून २००० हून अधिक जोडप्याचे छुप्या कॅमेऱ्याव्दारे चित्रीकरण”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!