हनुमान मूर्तीच्या विटंबना प्रकरणी एक जण ताब्यात

चंद्रपूर: बल्लारपूर तालुक्यातील विसापूर गावानजिक भिवकुंड नाल्याजवळील श्री हनुमान मूर्तीची काही समाजकंटकांनी तोडफोड केल्याने विसापूर येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. हिंदू संघटनांनी एकत्र येत चक्का जाम आंदोलन केले.

Recommended read: नागपूर-चंद्रपूर महामार्गावर भीषण अपघात

तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधिक्षकांना चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. दरम्यान बल्लारपूर पोलिसांनी गोंडपिपरी मार्गावर एका संशयित इसमास ताब्यात घेतले असता, त्यांच्या हाताला व कपड्याला तेल मिश्रीत शेंदूर लागल्याचे दिसून आले. दरम्यान त्याने श्री हनुमान मूर्तीची तोडफोड केल्याचे कबुल केले आहे.

Recommended read: आवळगावात धुमाकूळ घालणारा K-4 वाघ जेरबंद

सदर इसम हा मनोरूग्ण असून त्यांची बल्लारपूर पोलिस अधिक चौकशी करीत आहे. सदरची कारवाई पोलिस अधिक्षक रविंद्रसिंग परदेश यांच्या मार्गदर्शनात बल्लारपूर पोलिसांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!