ताडोबा लगतच्या अलिझंजा जंगलात वाघाच्या हल्यात गुराखी ठार

चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या अलिझंजा जंगल परिसरात गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुराख्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

Recommended read: कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम धरण ओव्हरफ्लो

सीताराम नन्नावरे असे मृतक गुराख्याचे नाव आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या खडसंगी, बाह्मणगाव, टेकेपार व अलिझंजा या गावात वाघाने धुमाकूळ घातला होता. त्यामुळे या परिसरात वाघाची दहशत होती. अशातच सीताराम नन्नावरे हा आपल्या मालकीचे बैल चारण्यासाठी अलिझंजा जंगल परिसरात गेला असता, दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला करून जागीच ठार केले आहे.

Recommended read: गोंडवाना विद्यापीठ : विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट ला सुरुवात

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचा चमू घटनास्थळी दाखल झाला असून पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.

2 thoughts on “ताडोबा लगतच्या अलिझंजा जंगलात वाघाच्या हल्यात गुराखा ठार”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!