गडचिरोली (गो वि )दि. १५: गेल्या सहा महिन्यांपासून गोंडवाना विद्यापीठ मधील संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न होता. त्या अनुषंगाने विद्यापीठाने टाटा कन्सल्टंन्सी सर्व्हिसेस मार्फत रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले .

यासाठी विद्यार्थ्यांना वेबसाईटवर नोंदणी करण्याचे आवाहन केले होते. त्याला ११०० विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला आणि त्यानंतर प्रत्यक्ष प्रशिक्षणाला ऑनलाईन सुरुवात करण्यात आली. विशेष म्हणजे, या प्रशिक्षणात विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाला असणारे किंवा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेले विद्यार्थांनी निशुल्क लाभ घेतला. प्रशिक्षणानंतर विद्यार्थ्यांना एक महिन्यासाठी शासकीय कार्यालयात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

Recommended read: कोरपना तालुक्यातील पकडीगुड्डम धरण ओव्हरफ्लो

गोंडवाना विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांना स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिल्या जात आहे. इको-टुरिझम प्रशिक्षण यासोबतच महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या जागतिक दर्जाच्या कंपन्यांकडूनही विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहे. महिंद्रा कंपनी महिन्याला ५० याप्रमाणे वर्षाला सहाशे विद्यार्थ्यांना रोजगार देणार आहे. स्थानिक व्यापारी असोसिएशन, फार्मसिस्ट असोसिएशन आणि राईस मील असोसिएशन सोबत विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षणाच्या संधींबाबत चर्चा करण्यात आली .

बी. कॉमच्या विद्यार्थ्यांना गडचिरोलीतील चार्टर्ड अकाउंटंट आनंद सारडा यांनी प्रशिक्षण दिले . डिसेंबर २०२२ पर्यंत ५०० जणांना नोकरी देण्याचा विद्यापीठाचा मानस आहे. यासंदर्भात दोन्ही जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाली असून चंद्रपूरचे जिल्हाधिकारी आणि ३६ उद्योजक यांच्याशी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. ज्यातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहे. गेल्या सहा महिन्यांपासून सुरु असलेल्या या सगळ्या प्रयत्नांचे यश म्हणजे युनिव्हर्स ऍग्रो टुरिझम प्रा. लि.कंपनीने 20 विद्यार्थ्यांना गुरवार दिनांक १४ ला नियुक्तीपत्र दिले.

Recommended read: काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या बारमध्ये धिंगाणा, एक जखमी

यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले, कुठलेही विद्यापीठ चार पायर्‍यांवर काम करते. विद्यार्थ्यांना प्रवेश देणे, शिकवणे, परीक्षा घेणे, निकाल जाहीर करणे. पण ज्या दिवशी पदवी परीक्षेचा निकाल लागतो, तेव्हा त्यांच्यापुढे शून्य उभा राहतो आणि आता पुढे काय करायचे, या प्रश्नाला आकार देण्याचे काम विद्यापीठाच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलने केले आहे.

प्रत्येक विद्यार्थ्यांमागे पालकांची वीस ते पंचवीस वर्षांची मेहनत असते आणि या मेहनतीचे चीज होणे महत्त्वाचे असते, असे ते म्हणाले.

Recommended read: भारतात आढळला EMM negative दुर्मिळ रक्तगट

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गोंडवाना विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, कुलसचिव डॉ.अनिल झेड.चिताडे, युनिव्हर्स ऍग्रो टुरिझम प्रा.लि.कंपनीचे प्रमुख भारत धोटे , विज्ञान आणि तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर, सेंट्रल प्लेसमेंट समन्वयक डॉ. अनिरुद्ध गचके आदी उपस्थित होते.

यावेळी युनिव्हर्स ऍग्रो टुरिझम कंपनीचे प्रमुख, उद्योजक भारत धोटे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या रोजगाराला अधिकाधिक चालना देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्याचे सुवर्ण पान रंगवण्याचा आमचा मानस आहे आणि गोंडवाना विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांसाठी संधीचे हे नवे दालन आहे.

यावेळी गोंडवाना विद्यापीठ आणि युनिव्हर्स ऍग्रो टुरिझम प्रा. लि.यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला.
याप्रसंगी विद्यार्थ्यांचे पालक ऋषी होडी आणि रामचंद्र भुसारी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना रोजगार मिळून त्यांचा आर्थिक स्तर वाढावा या उदात्त हेतूने गोंडवाना विद्यापीठाच्या सेंटर प्लेसमेंट सेलतर्फे युनिव्हर्स ऍग्रो टुरिझम प्रा.लि. कंपनीकडून प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले होते. यात गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यातून २० विद्यार्थ्यांची निवड युनिव्हर्स ऍग्रो टुरिझम कंपनीकडून करण्यात आली. गुरवार ला त्या विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी विद्यार्थी तसेच पालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या मार्गदर्शनात विज्ञान आणि तंत्रज्ञान अधिष्ठाता डॉ. सुरेश रेवतकर ,ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर पदव्युत्तर शैक्षणिक विभाग उत्तमचंद कांबळे आणि समन्वयक अनिरुद्ध गचके यांच्या प्रयत्नांचे हे फलित आहे. संचालन आणि आभार ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर उत्तमचंद कांबळे यांनी केले.

कार्यक्रमाला सर्व संविधानिक अधिकारी ,शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, तसेच युनिव्हर्स ॲग्रो टुरिझम कंपनीची चमू आदींची उपस्थिती होती.

One thought on “गोंडवाना विद्यापीठ : विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट ला सुरुवात”

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!