गडचिरोली (गो वि ) : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016अन्वये विद्यापीठातील विविध प्राधिकरणाच्या २०२२ निवडणूका सर्वात प्रथम म्हणजेच ४ सप्टेंबरला घेणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

४ सप्टेंबर ला होऊ घातलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या अधिसभा (सिनेट) च्या प्राचार्य ,शिक्षक व पदवीधर अशा तीन गटातून एकूण ३३ जागांसाठी ८८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे ठाकले आहे.

Recommended read: ढोल ताश्यांच्या गजरात गणपत्ती बाप्पाचे आगमन

शिक्षक मतदार संघातून 10 प्रतिनिधी निवडून द्यायचे आहेत. त्यासाठी 42 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. खुल्या गटातून ५ उमेदवार निवडून द्यावयाचे असून त्यासाठी २१उमेदवार उभे आहेत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,विमुक्त व भटक्या जमाती ,इतर मागास वर्ग व महिला यातून प्रत्येकी एक उमेदवार असे ५ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. त्यासाठी ही पहिल्या ४प्रवर्गातून प्रत्येकी ४ वा महिना प्रवर्गातून ५ उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत.

विद्यापरीषदे मधून विज्ञान व तंत्रज्ञान, मानवविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन, आंतरविद्याशाखा यातून प्रत्येकी दोन उमेदवार निवडून द्यायचे आहेत. आंतरविद्याशाखेसाठी सर्वच उमेदवारी अर्ज अपात्र ठरले. उर्वरित तीन शाखामधील राखीव गटातील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर खुल्या गटातून विज्ञान व तंत्रज्ञान मधून ३,मानवविद्या शाखेतून ४, वाणिज्य व व्यवस्थापन मधून २ उमेदवार रिंगणात आहेत.

Recommended read: हॅलो, मी तुमच्या घरी चोरी केली! अजब चोरटयाचा गजब पराक्रम

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016अन्वये विद्यापीठातील विविध प्राधिकरणाच्या २०२२च्या निवडणूका सर्वात प्रथम म्हणजेच ४ सप्टेंबरला घेणारे गोंडवाना विद्यापीठ हे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरले आहे. ३६ मतदार केंद्रांच्या केंद्रनिहाय मतदार याद्या तयार करण्यात आल्या असून त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

३१ऑगस्ट २०२२ ला सर्व प्राधिकरणाचा कार्यकाळ संपलेला आहे आणि विद्यापीठाचे प्रशासन सुव्यवस्थित चालवण्याच्या दृष्टिकोनातून प्राधिकरणाच्या निवडणुका घेणे आवश्यक असते. त्यामुळे ४ सप्टेंबरला विविध प्राधिकरणाच्या निवडणुका आहेत. ७ आणि ८ सप्टेंबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणुका सुकर आणि सुरळीत पार पाडल्या जाव्यात ,यासाठी चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन्ही जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्यात आले. जेणेकरून कर्मचाऱ्यांना कुठल्याही अडचण निर्माण होणार नाही. कुलगुरू डॉ. प्रशांत बोकरे आणि कुलसचिव तथा निवडणूक निर्वाचन अधिकारी डॉ. अनिल हिरेखन यांच्या मार्गदर्शनात विद्यापीठाचे कर्मचारी निवडणुकीच्या सफल आयोजनासाठी अविरत परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!