गोंडवाना विद्यापीठाचा ५३.४८ कोटीचा अर्थसंकल्प मंजूर

गोंडी आणि माडीया भाषेचा
भाषाशास्त्र विषयात समावेश

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचा अर्थसंकल्पीय अधिसभेत ५३.४८ कोटीचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला . व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. योगेश्वर दुधपचारे यांनी हा अर्थसंकल्प सादर केला. विद्यापीठ सभागृहात अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात अधीसभा सदस्यांची बैठक कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .

सभेच्या सुरवातीला मागील सभेच्या कार्यवृत्तावर चर्चा करण्यात आली. विद्यापीठाला २०० एकर जागा मिळाल्याबाबत अभिनंदनाचा ठराव पारीत करण्यात आला. सोबतच विद्यापीठाचे विद्यार्थी सुविधा केंद्र अहेरीला सुरु करण्याचा प्रस्तावाला कुलगुरू महोदयांनी मान्यता दिली. यानंतर दुपारच्या सत्रात व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. योगश्वर दुधपचारे यांनी २०२२-२०२३ चा अर्थसंकल्प सादर केला. सर्वसमावेशक चर्चेनंतर सभागृहाने अर्थ संकल्पास मंजुरी दिली.

रेनवॉटर हार्वेस्टिंग हा उपक्रम गोंडवाना विद्यापीठ आणि सर्व संलग्नित महाविद्यालयात राबविणार

गोंडवाना विद्यापीठ आणि संलग्नित सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामाजिक दायित्व म्हणून दरवर्षी रेन वॉटर हार्वेस्टिंग हा उपक्रम राबविणार यासंदर्भातल्या प्रस्तावाला उत्तर देताना कुलगुरू डॉ.प्रशांत बोकारे म्हणाले, सर्वत्र होत असलेले काँक्रिटीकरण आणि त्यामुळे पावसाच्या पाण्याची होणारी नासाडी, त्यामुळे पाणी टंचाई सारख्या गंभीर समस्येला सामोरं जावं लागतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज अधोरेखित होते.

Recommended read: नक्षलवाद्यांचा गणवेश घालून, बंदुकीचा धाक दाखवून मागितली २५ लाखांची खंडणी

रेनवॉटर हारवेस्टिंग , पाणी अडवा आणि पाणी जिरवा हा उपक्रम आपण राबवत आहोत आणि त्यामुळे पाणी जमिनीत मुरेल. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांकडून नदीतली माती आपण उपसून घेणार आहोत, त्यामुळे पाणी जमिनीत चांगलं मुरेल आणि त्याचा फायदा नद्यां, विहिरी, बोरवेल्स यात चांगले पाणी मुरेल .रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्याचा या प्रस्तावाला मान्यता देत त्यांनी विद्यापीठांमध्ये हा उपक्रम राबवण्याचा शाश्वती दिली.

विद्यापीठात गोंडी माडिया व इतर जनजातीय भाषा विभाग सुरू करण्याचा प्रस्ताव होता ,या प्रस्तावाला उत्तर देताना कुलगुरू म्हणाले ,गोंडी आणि माडिया भाषेला स्वतःची लिपी आहे .भाषाशास्त्र विषयांमध्ये गोंडी आणि माडिया भाषा सुरू करणे आणि या भाषेतून कथा आणि म्हणी त्यांचे संकलन विद्यापीठामध्ये राहील. त्याचा निश्चितच फायदा विद्यार्थ्यांना होईल. त्यामुळे हा प्रस्ताव त्यांनी मान्य केला.

प्रस्ताव, गोंडवाना विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अपघात विमा काढण्याबाबत कुलगुरू महोदय यांनी मान्यता दिली. गोंडवाना विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांचे अपघात विमा विद्यापीठ स्तरावर एकत्रितरीत्या सामूहिक अपघात विमा काढला काढला जाईल असे त्यांनी सांगितले.

गडचिरोली गोंडवाना विद्यापीठ येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र सुरु करण्याबाबत मागणी होती ती त्यांनी मान्य केली.

व्यासपीठावर प्र- कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे उपस्थित होते. संचालन करून आभार कुलसचिव तथा अधिसभा सदस्य सचिव डॉ. अनिल झेड. चिताडे यांनी मानले

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!