गोंडपिपरी : रानडुक्कराच्या हल्ल्यात शेतकरी ठार

गोंडपिपरी तालुक्यातील फुरडी-हेटी येथील घटना

चंद्रपूर: गोंडपिपरी तालुक्यातील फुरडी हेटी येथील शेतकरी शेतात जाताना रानडुक्कराच्या कळपाने धडक दिल्याने शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना फुरडी – हेटी गावालगत शुक्रवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.

Recommended read: नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देऊन बळीराजाचा सन्मान

अविनाश भगवान निखाडे (४८) असे मृतक शेतकऱ्यांचे नाव आहे. सध्या स्थितीत फुरडी हेटी, वढोली शेतशिवारात व गावात रानडुक्करांनी हैदोस घातला आहे. गावातील नागरिकांना दहशतीत जीवन जगावे लागत आहे दररोज रानडुक्करांचे हल्ले शेतकऱ्यांवर होत आहे. अशातच शुक्रवारी सकाळी अविनाश भगवान निखाडे हे शेतात जात असतांना अचानक गावाच्या बाहेर पडताच रानडुक्कराच्या कळपाने त्यांना जबर धडक दिली.

घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. लगेच ग्रामीण रुग्णालयात गोंडपिपरी उपचारासाठी नेत असताना वाटेतच प्राणज्योत मावळली. अचानक झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे फुर्डी हेटीसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Recommended read: 13 ते 15 ऑगस्ट रात्रीसुध्दा फडकणार घरावर तिरंगा- हर घर तिरंगा

शासनाने तात्काळ कुटुंबियांना मदत करावी अशी मागणी नागरिकांकडून केल्या जात आहे. अविनाश च्या पच्यात पत्नी, दोन मुले व बराच मोठा आप्त परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!