ईडीमुळे आलेले शिंदे फडणवीस सरकार असंवैधानिक- नाना पटोले

चंद्रपूर: अतिवृष्टी व पूरामुळे या जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने दाखविलेले ६३ हजार हेक्टरवरील नुकसानीची आडेवारी कमी आहे. येथे शंभरटक्के नुकसान झाले असून कापूस व सोयाबीन पाण्याखाली गेल्याने आता पिक घेताच येणार नाही. तेव्हा राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून एकरी २५ हजार रूपये मदत द्यावी अशी मागणी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

दरम्यान राज्यातील ईडीचे सरकार असंवेधानिक असल्याची टिका देखील केली. राज्यात सरकारच अस्तित्वात नसल्याने पुरग्रस्त पाच हजाराच्या मदतीपासूनही वंचित राहिले आहेत अशी खंत बोलून दाखविली.

Recommended read: वरोरा येथे वीज कोसळून चार महिलांचा मृत्यू

या जिल्ह्यात महापुर आल्यानेतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार बाळू धानोरकर, आमदार ॲड.अभिजित वंजारी, आमदार सुभाष धोटे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, शहर जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांनी शनिवारी राजुरा, बल्लारपूर तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देत तेथील शेतकरी, शेतमजूर यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर पत्रपरिषदेत पटोले यांनी महापुरानंतर शेतकऱ्यांची दैनावस्था कथन केली.

चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी व पूरामुळे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. कापूस व सोयाबीन पाण्याखाली गेल्याने या हंगामात कापूस व सोयाबिन पिक होणार नाही. तेव्हा राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करून एकरी २५ हजार रूपये मदत जाहीर करावी अशी मागणी पटोले यांनी केली.

राजुरा, बल्लारपूर, चंद्रपूर या अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाची पाहणी

चंद्रपूर शहरात सहा हजार घरात पुराचे पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाव्दारे तात्काळ मदत म्हणून ५ हजार रूपये दिले जाते. मात्र, प्रशासनाकडे तात्काळ मदत देण्यासाठी निधीच उपलब्ध नाही. निधीसाठी शासनाकडे मागणी केली आहे. राज्यात सरकार अस्तित्वात नसल्यामुळे पुरग्रस्तांना मदत मिळायला उशिर होत आहे.

सद्याचे सरकार हे असंवैधानिक असून शिंदे व फडणवीस सरकार हे ईडी मुळे आले असल्याचे पटोले म्हणाले.

Recommended read: प्लॉस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

भाजपमुळेच चंद्रपूर व गडचिरोलीत सुलतानी संकट

गडचिरोलीतील गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या मेटीगड्डा धरणामुळे सिरोंचा तालुक्यातील ५ गावे पूर्णत पाण्याखाली गेली आहे. ५० गावांना धरणामुळे पुराचा फटका बसला आहे. तत्कालीन भाजप सरकारने धरणाला मान्यता देताना कोणतेही नियम व मान्यता घेतली नाही. आता या धरणातून २७ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग झाला. त्यामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावे पुराखाली गेली.

शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले असतांना भाजपने चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुलतानी संकट निर्माण केल्याचा आराेप यावेळी नाना पटोले यांनी केला.

राज्यपालांनी माफी मागावी – नाना पटोले

गुजराती व मारवाडी लोकांमुळेच मुंबईची शान असल्याचे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केले. या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो. राज्यपालांनी महाराष्ट्रातील जनतेचा अपमान केला असून त्यांनी त्वरीत जनतेची माफी मागावी व त्यांची उचलबांगडी करावी अशी मागणी नाना पटोले यांनी यावेळी केली.

Recommended read: गोंडवाना विद्यापीठाची प्रथमच QR कोड असलेली गुण पत्रिका

राज्यपालांनी महाराष्ट्राचे वस्त्रहरण करण्याचे काम सुरू केले आहे. यापूर्वीदेखील महात्मा ज्योतीबा फुले दाम्पत्यांचा कोश्यारी यांनी अपमान केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!