देहव्यापार : ब्रम्हपुरी येथील बंगल्यात वास्तव्याला असलेल्या दाम्पत्याला अटक

चंद्रपूर: देहव्यापार साठी कोलकता येथून अपहरण केलेल्या अल्पवयीन १४ वर्षीय मुलीची ब्रम्हपुरी शहरातून सुटका करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोस्कोचा गुन्हा दाखल करित ब्रम्हपुरी येथील मंजित रामचंद्र लोणारे (४०), चंदा मंजित लोणारे (३२) या दाम्पत्याला अटक केली आहे.

Recommended read: चंद्रपूर व भद्रावती तालुक्यात लम्पीची लागण

नागपुरातील एका सामाजिक संस्थेने चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्याकडे अल्पवयीन मुलीकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याची तक्रार दाखल केली होती. ब्रम्हपुरी शहरात काही ठिकाणी बाहेरून मुली आणून त्यांच्याकडून देह व्यापार करवून घेतला जात आहे.

या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी ब्रम्हपुरी येथील मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेट कॉलनी बंगला क्रमांक १४ येथे बनावट ग्राहक पाठविला. त्यानंतर तक्रारीची शहानिशा करून घेतली. या बनावट ग्राहकाने इशारा करताच बंगल्यावर छापा टाकण्यात आला.

Recommended read: सोमय्या पॉलिटेक्निक च्या प्राचार्याला शिवसेनेच्या कार्यकर्त्यां कडून मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

यावेळी कोलकाता येथुन देहव्यापारासाठी अपहरण केलेल्या एका मुलीची पोलिसांनी ब्रह्मपुरी शहरातून सुटका केली आहे. याप्रकरणात मालडोंगरी मार्गावरील विदर्भ इस्टेटमध्ये वास्तव्यास असलेल्या मंजित रामचंद्र लोणारे , चंदा मंजित लोणारे या दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. विशेष म्हणजे या मुलीला नागपुरात प्रथम विकले होते. त्यानंतर तिला ब्रम्हपुरी येथे पाठविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!