गोसेखुर्द कालव्यात 11 वर्षिय मुलींचा बुडून मृत्यू

चंद्रपूर: ब्रह्मपुरी तालुका मुख्यालयापासून पासून 7 किमी अंतरावर असलेल्या रानबोथली येथील अमृता संदीप मरसकोल्हे (11) हीचा गोसेखुर्द कालव्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची घटना 20 नोव्हेंबरला सकाळी 11.00 वाजताच्या दरम्यान घडली.

Recommended read: भेकरची शिकार करून मांस शिजविणाऱ्या नऊ जणांना अटक

प्राप्त माहितीनुसार मृतक अमृता ही आपल्या आजी सोबत शेतावर गेली होती. ती गोसेखुर्द कालव्याजवळ शौचासाठी गेली मात्र कालव्याच्या पायऱ्या उतरत असताना तिचा तोल गेल्यामुळे ती पाण्यात पडली. बराच वेळ परत न आल्याने अखेरीस आजीने तिची शोधाशोध सुरू केली.

ही माहिती मिळतात गावातील लोकांनी कालव्याकडे धाव घेऊन कालव्यातील पाण्यात शोध घेतला असता तिथे अमृता मृतावस्थेत आढळून आली. अमृता ही घरात लाडकी असल्याने घरातील लोकांवर दुःखाचे डोंगर कोसळले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Recommended read: आरोपींना बेदम माहरण केल्याप्रकरणी ठाणेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

सदर घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पो.स्टे.चे उपपोलिस निरीक्षक सुरेंद्र उपरे,पोलीस हवालदार धनरे, पो. ह. दुपारे यांनी पंचनामा करून शव ग्रामीण रुग्णालय ब्रम्हपुरी येते उत्तरिय तपासणी साठी पाठविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!