घुग्घुस नगर परिषद चे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर निलंबित

चंद्रपूर: घुग्घुस नगर परिषद चे तत्कालीन मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर यांना निलंबित करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

अमराई वॉर्डात २६ ऑगस्ट रोजी भुस्खलनाची घटना घडली. त्या भागातील १६० कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून राज्याचे वने व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते धनादेशाद्वारे प्रत्येकी १० हजार रुपये आर्थिक मदत देण्याच्या ८ सप्टेंबर रोजीच्या कार्यक्रमाची मुख्याधिकारी म्हणून पिदूरकर यांना पूर्वकल्पना होती.

Recommended read: शिवीगाळ, मारहाणप्रकरणी पुगलिया बंधूंसह १२ जणांवर गुन्हे

या कुटुंबियांच्या नावाचे १६० धनादेशदेखील त्यांच्या अधिनस्त नगर परिषदेच्या ताब्यात होते. मात्र, केवळ त्यांच्या निष्काळजीपणामुळे धनादेश वाटपाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मंत्र्यांना व १६० कुटुंबियांना ३ तासाहून अधिक काळ वाट पाहावी लागली. ही बाब मुख्याधिकारी या पदावरील अधिकाऱ्यांस अशोभनीय व गंभीर असून, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९८१ च्या तरतूदीचा भंग करणारी आहे.

पिदूरकर यांच्याकडे भद्रावती नप या पदाचा नियमित कार्यभार ८ जुलै २०२० पासून आहे. तसेच घुग्घुस न. प. च्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार ८ ऑगस्ट २०२२ रोजीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये त्यांच्याकडेच होता. जिल्हाधिकारी यांच्या १२ सप्टेंबर २०२२ च्या आदेशान्वये मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे. तसेच सध्या कार्यरत असलेल्या मुख्याधिकारी भद्रावती नगर परिषद या पदावरून निलंबित करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला आहे.

Recommended read: भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी मनपाला लुटले – पप्पू देशमुख यांचा आरोप

पिदूरकर यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ पोटकलम (१) (अ) च्या तरतुदीनुसार तत्काळ निलंबित करण्यात येत असून, ते पुढील आदेश काढले जाईपर्यंत निलंबित राहतील, असे आदेशात नमूद आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!