गणपत्ती बाप्पा मोरया च्या जयघोषात बाप्पाची घटस्थापना

चंद्रपूर: गणपत्ती बाप्पा मोरया च्या जयघोषात व ढोल ताश्यांच्या गजरात जिल्हाभरात बुधवारी बाप्पाचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. करोनामुळे दोन वर्ष ठप्प झालेला गणेशोत्सव यावर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे.

कोणतेही निर्बंध नसल्यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांनी बाप्पाची पाच ते सहा फूटाची गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. तर, घरगुती बाप्पाची घटस्थापना करण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच बाजारात गर्दी करीत मोठ्या उत्साह व आनंदाने बाप्पाची घरी प्रतिष्ठापना केली आहे.

Recommended read: हॅलो, मी तुमच्या घरी चोरी केली! अजब चोरटयाचा गजब पराक्रम

करोनामुळे मागील दोन वर्षापासून गणेशोत्व साजरा करण्यावर शासनाने निर्बंध घालून दिले होते. त्यामुळे गणेशोत्सव निर्बंधमुक्त साजरा होवू शकला नाही. यंदा शासनाने निर्बंधमुक्त गणशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. तसेच गणेशाच्या चार फूटाच्या मूर्तीवरील निर्बंधसुध्दा हटविण्यात आले आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव जिल्ह्यात मोठ्या उत्साहाने व आनंदान साजरा होत आहे.

सार्वजनिक गणेश मंडळांनी मंगळवार पासूनच गणेश मूर्तीना घेवून जाण्यासाठी लगबग लागली होती. चंद्रपूर शहरात १२८ सार्वजनिक गणेश मंडळांनी महानगरपालिकेकडे परवानगी साठी अर्ज केला आहे. बुधवारी सकाळपासूनच छोटा बाजार, कस्तुरा मार्ग, रघुवंशी कॉम्पेक्स परिसरात गणेश भक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. ढोल, ताश्यांच्या गजरात लाडक्या बाप्पाला नागरिक घरी घेवून जात होते.

Recommended read: तुडूंब भरलेल्या चारगाव धरणात दोघेजण बुडाले

जिल्ह्यात घरगुती गणेशाची घटनास्थापना सर्वाधिक होते. घरगुती गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी भाविकांनी सकाळपासूनच रेलचेल होती. पूजा व सजावटीचे साहित्य, मखर, तोरण, विद्युत माळा, सजावटीचे फुले, केवड्याची पाने, कमल, दुर्वा, तुळशी, पत्री, पेढे, मोदक आदी साहित्य खरेदी करण्यासाठी गोलबाजारात प्रचंड गर्दी उसळली होती.

दोन वषा्रनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरात होत असल्याने सार्वजिनक गणेश मंडळांनी भव्य देखावे, विविध प्रतिकात्मक गणेश मूर्ती तसेच मनमोहक देखावे तयार केले आहे. पीओपी मूर्तीवर बंदी असल्याने चंद्रपूरात मातीच्या गणेश मूर्ती विकल्या गेल्या आहेत.

दीड व तीन दिवसाच्या गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी महानगरपालिकेव्दारे शहरात विविध ठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!