एका जहाल नक्षलवाद्यांस कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलीस दलास यश

८ एमएम रायफल व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य जप्त

गडचिरोली: उपविभाग अहेरी अंतर्गत येणाऱ्या उपपोस्टे राजाराम (खां) हद्दीत मौजा कापेवंचा जंगल परिसरात विलय दिन सप्ताहाच्या पार्श्वभुमीवर अहेरी दलम, पेरमिली दलमचे ३० ते ४० नक्षलवादी मोठया प्रमाणात घातपात करण्याच्या उद्देशाने दिनांक २८/०९/२०२२ रोजीच्या सकाळी एकत्र जमलेले असल्याच्या गोपनिय माहीतीवरून मौजा कापेवंचा जंगल परिसरात गडचिरोली पोलीस दलातील विशेष अभियान पथकाचे (सी-६०) जवान नक्षलविरोधी अभियान राबवित असतांना दिनांक २८/०९/२०२२ रोजीचे सायं. ७:०० ते ८:०० वाजताच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या ३० ते ४० नक्षलवादयांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने जवानांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला.

Recommended read: चंद्रपूर शहरात तीन मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली

त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला, जवांनानी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.

Recommended read: अखेर राजुरा – सास्ती रस्त्यावरील खड्ड्याने घेतला बळी

सदर नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे.चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असतांना घटनास्थळावर ०१ नक्षल मृतदेह मिळुन आले. तसेच मृतदेहासोबत ८ एमएम रायफल व मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे.

Recommended read: कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया नंतर ही पत्नी झाली गर्भवती

नक्षल मृतदेह जिल्हा मुख्यालय येथे आणले असता, सदर मृतदेह हे काळे-हिरवे कपडे घातलेल्या महिला नक्षलीचा असून, तिची ओळख पटविणे सुरु आहे.माहे आक्टोबर २०२० रोजी पासून ते आतापर्यंत एकुण ५५ नक्षलवादी विविध चकमकीत ठार झाले असून, ४६ नक्षलवादी अटक व १९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

Recommended read: ट्रकच्या धडकेत महिला ठार संतप्त जमावाने १० ट्रक पेटवले

सदर अभियान मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे साो. मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. समीर शेख साो. व मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) अनुज तारे साो. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-६० कमांडोच्या या शीर्यपूर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री. अंकित गोयल साो. यांनी कौतुक केले आहे. तसेच नक्षल विरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!