हिवरा गावात नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर संपन्न

चंद्रपूर: नववर्षांचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते गजेंद्र चोथले यांच्या पुढाकाराने श्री सत्यसाई मोबाईल मेडीकेअर महाराष्ट्र व्दारे गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा येथे भव्य नि:शुल्क आरोग्य तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर घेण्यात आले.

Recommended read: वाघाच्या हल्ल्यात शेतकर्‍ याचा मृत्यू

सकाळी १०.३० वाजतापासून शिबीराला सुरूवात झाली. या आरोग्य शिबीराचा २०० हून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. रूग्णांची तपासणी डाॅ. कौशल्या अडवाणी, मेडीकल प्रकल्प समन्वयक बबन तितीरमारे, निमंत्रक नरेंद्र गणमुकलवा, चंद्रशेखर मुनगंटीवार उपस्थित होते. शिबीराच्या यशस्वीतेसाठी रत्नजोत कांबळे यांच्या चमूने परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!