मृतकांमध्ये वरोरा माजी पंचायत समिती सदस्यांच्या पत्नीसह इतर तीन महिलांचा समावेश

चंद्रपूर: वरोरा तालुक्यातील वायगाव भोयर येथे शेतात वीज कोसळल्याने चार महिलांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. मृतकांमध्ये माजी पंचायत समिती सदस्यांच्या पत्नीसह इतर तीन महिलांचा समावेश आहे.

Recommended read: प्लॉस्टिकमध्ये गुंडाळलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

मृतकामध्ये वरोरा पंचायत समितीचे माजी सदस्य शालिक झाडे यांच्या पत्नी हिरावती शालिक झाडे (४५), पार्वताबाई रमेश झाडे (५५), मधुमती सुरेश झाडे (२२), रीना नामदेव गजभे (२३) यांचा समावेश आहे.

वरोरा पंचायत समितीचे माजी सदस्य शालिक झाडे यांचे शेतात आज त्यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्या हिरावती शालिक झाडे या पार्वताबाई रमेश झाडे, मधुमती सुरेश झाडे, रीना नामदेव गजभे यांना सोबत घेवून शेतात काम करीत असतांना अचानक पावस आला. पावसापासून बचाव वाचण्याकरिता त्यांनी शेतातील पळसाच्या झाडाचा आधार घेतला असता त्याचवेळी त्याच झाडावर वीज कोसळल्याने चारही महिलांचा दुदैवी मृत्यू झाला.

Recommended read: वीज कोसळून शेतकऱ्यांचा मृत्यू

सदर घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती पोलिसांना कळताच शेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. सदर घटनेचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!