चिचपल्लीजवळ चारचाकी वाहनाचा भिषण अपघात, सासू सुनेचा जागीच मृत्यू- IG Media Chandrapur

सहा जण गंभीर जखमी

पारखी कुंटूबियांवर दु:खाचा डोंगर

चंद्रपूर : पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आटाेपून पारखी कुटूंबिय चंद्रपूरहून चामोशीकडे जात असतांना चिचपल्ली जवळ चारचाकी वाहून वाहन उलटून भिषण अपघात झाला. या अपघात पारखी कुटूंबातील सासू व सुनेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सहा जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Recommended read: नक्षलवाद्यांकडून दोघांची दगडाने ठेचून हत्या

पोलिस कर्मचारी असलेले अनिल पारखी हे चंद्रपूर मोठ्या भावाच्या पुण्यस्मरणाच्या कार्यक्रमाला आले होते. गुरूवारी रात्री पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर पारखी कुटूंबिय चामोर्शी कडे जाण्यास निघाले. चिचपल्ली जवळ वाटेत जनावर आडवे आल्याने चालकाने करकचून ब्रेक दाबला असता, वाहन उलटून बाजूलाच असलेल्या छोट्या नाल्यात पडले.

हा अपघात इतका भिषण होता कि, चारचाकी वाहनांचा चेंदामेंदा झाला होता. यामध्ये पोलिस कर्मचारी अनिल पारखी यांची पत्नी किरण पारखी (३२), शोभा पारखी (६५) यांचा जागीच मृत्यू झाला. तर, अनिल पारखी (४०), साधना पारखी (४५), राम पारखी (७), आराध्या पारखी (४), ओम (१०) व नंदिनी (१४) हे सहा जण गंभीर जखमी आहेत. अपघाताची बातमी माहिती होताच चिचपल्ली येथील काही नागरिकांनी सर्वांना बाहेर काढत उपचारासाठी खाजगी रूग्णालयात दाखल केले.

अपघातात एकाच कुंटूंबातील सासू व सुनेचा मृत्यू व सहा जण गंभीर जखमी झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. पारखी कुंटूंबियावर आघात झाला असतांना काही संधीसाधूने चक्क पारखी कुंटूंबाचे सोन्यांचे दागिने लंपास केल्याचे बोलले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Content may be subject to copyright.
error: Content is protected !!